मुंबई-नागपूर दुरांतो वर्धा रेल्वेस्थानकावर तीन तास खोळंबली; प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 17:50 IST2021-09-17T17:49:56+5:302021-09-17T17:50:35+5:30
Wardha News तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल गाडी तीन तास वर्धा येथे खोळंबली आणि १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबई-नागपूर दुरांतो वर्धा रेल्वेस्थानकावर तीन तास खोळंबली; प्रवाशांना मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल गाडी तीन तास वर्धा येथे खोळंबली आणि १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. (Mumbai-Nagpur Duranto at Wardha railway station for three hours; Annoyance to passengers)
रेल्वेगाडी क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर दुरांतो स्पेशल मुंबईवरून नागपुरात सकाळी ७.२० वाजता येते. ही गाडी वर्धा रेल्वेस्थानकावर थांबत नाही. मुंबईवरून निघाल्यानंतर ही गाडी भुसावळला पाच मिनिटे थांबून थेट नागपूरला पोहोचते. परंतु शुक्रवारी सकाळी वर्धा रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी तब्बल तीन तास तेथेच खोळंबली. बिघाड दूर केल्यानंतर ही गाडी नागपूरसाठी रवाना झाली. त्यामुळे सकाळी ७.२० वाजता येणारी दुरांतो सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचली. त्यामुळे या गाडीतील १२०० च्या वर प्रवाशांना मनस्ताप सहन करून वर्धा रेल्वेस्थानकावर गाडीतच बसून राहण्याची पाळी आली. कुठेच थांबत नसल्यामुळे प्रवासी दुरांतोच्या प्रवासाला पसंती देतात. परंतु दुरांतोतही मनस्ताप झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
...............