शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

महिलांसह ज्येष्ठांना ५०० रुपयांत 'पंढरपूर' गाठून घेता येणार 'विठ्ठल-रुक्मिणी'चे दर्शन

By महेश सायखेडे | Updated: June 6, 2023 18:19 IST

रापम पाठविणार ५९ जादा बसेस

वर्धा : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस वारकऱ्यांसह अनेकांना असते. आषाढी एकादशीचे औचित्य साधून रापमच्या वर्धा विभागाने जिल्ह्यातील पाचही आगारातून तब्बल ५९ जादा बसेस पंढरपूरला पाठविण्याचे नियोजन केले आहे. ही विशेष बस सेवा २३ जूनपासून सुरू होणार असून या बसेसमध्ये महिलांना महिला सन्मान योजना तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ देत प्रवास भाड्यात मोठी सवलत दिली जाणार आहे. एकूणच वर्ध्यातील ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना सुमारे ५०० रुपयांतच पंढरपूर गाठून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता घेणार आहे.पाच आगारांमधून सोडणार ५९ बसेस

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत. या पाचही आगारांमधून आषाढी एकादशीचे औचित्य साधून २३ जूनपासून विशेष बसेस पंढरपूरच्या दिशेने सोडल्या जाणार आहेत. वर्धा, आर्वी, हिंगणघाट, तळेगाव, पुलगाव या पाचही आगारांमधून एकूण ५९ बसेस सोडल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.कुठल्या आगारातून किती बसेस सोडणार?वर्धा : २४आर्वी : १२हिंगणघाट : १५तळेगाव : ०३पुलगाव : ०५वयोवृद्धांना बसचा प्रवास मोफत

महिलांना महिला सन्मान योजना तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ देत प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. आषाढी एकादशीचे औचित्य साधून वर्धा जिल्ह्यातील पाच आगारांमधून सोडण्यात येणाऱ्या ५९ बसेसमध्ये ही सवलत प्रवाशांना मिळणार आहे. शिवाय वयोवृद्ध म्हणजे ७५ वर्षांपुढील वयोवृद्धांना संबंधित बसेसमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेचा लाभ देत त्यांच्याकडून कुठलेही प्रवास भाडे स्वीकारले जाणार नाही. एकूणच वयोवृद्धांना मोफत प्रवास सेवेचा लाभ दिला जाणार आहे.ॲडव्हान्स बुकिंगची सुविधा

गावकरी समूह, वारकरी समूह, भजनी मंडळ, मंदिर समिती या सारख्या समूहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी म्हणून रापमच्या वतीने ॲडव्हान्स बुकिंगची सुविधा पाचही आगार व बसस्थानकांवर केली आहे.कुठून कुणाला किती लागेल प्रवास भाडे?

कुठून कुठंपर्यंत - अंतर : पूर्ण तिकीट : ज्येष्ठ नागरिक तिकीट : महिलांकरिता तिकीटवर्धा ते पंढरपूर - ६२४ किमी : ९०५ रुपये : ४५५ रुपये : ४५५ रुपयेआर्वी ते पंढरपूर - ६१६ किमी : ८९५ रुपये : ४५० रुपये : ४५० रुपयेहिंगणघाट ते पंढरपूर - ७३२ किमी : १०६० रुपये : ५३० रुपये : ५३० रुपयेतळेगाव ते पंढरपूर - ६५४ किमी : ९५० रुपये : ४८० रुपये : ४८० रुपयेपुलगाव ते पंढरपूर - ६१२ किमी : ८९० रुपये : ४५० रुपये : ४५० रुपये

टॅग्स :state transportएसटीPandharpurपंढरपूरroad transportरस्ते वाहतूक