शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रमांकडे मंडळांची वाटचाल

By admin | Updated: September 27, 2014 01:52 IST

जिल्ह्यात नवरात्रीच्या उत्सवाचे आगळे महत्त्व आहे. मोठ्या भक्तीभावाने आणि तेवढ्याच श्रद्धेने ...

गोंदिया : जिल्ह्यात नवरात्रीच्या उत्सवाचे आगळे महत्त्व आहे. मोठ्या भक्तीभावाने आणि तेवढ्याच श्रद्धेने हा उत्सव साजरा केला जात असला तरी यातील काही अनावश्यक खर्चाच्या बाबी आणि बडेजावपणा टाळून तो पैसा सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यासाठी आता काही मंडळे पुढाकार घेत आहेत. ‘लोकमत परिचर्चे’त सहभागी शहरातील प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब कबुल सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. गोंदियातील सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती गांधी पुतळा चौकचे अध्यक्ष महेश अग्रवाल, श्री टॉकीज दुर्गा उत्सव समितिचे अध्यक्ष महेंद्र जैन, वल्लभभाई चौक दुर्गा उत्सव समिती राजलक्ष्मी चौकचे अध्यक्ष मयूर दरबार, बंगाली असोसिएशन दुर्गा उत्सव समितीचे सुसेनजीत शाह, भास्कर बैनर्जी, मृत्युंंजय भट्टाचार्य आदी पदाधिकारी या चर्चेत सहभागी झाले होते. देवीचा उत्सव मागील अनेक वर्षांपासून साजरा करीत असल्याने काही मंडळांनी नियमित वीज कनेक्शन तर काही लोकांनी केवळ उत्सवाकरिता तात्पुरते वीज कनेक्शन घेतले आहे. रस्त्यांवर किंवा रस्त्यालगत दुर्गा उत्सव मंडळाचे मंडप टाकले जातात. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत नाही का? असा प्रश्न केला असता लोकांना अडचण होईल अशा पद्धतीने कोणी मंडप टाकत नसल्याचे सांगितले आणि थोडी अडचण झाली तरी ती लोक आनंदाने सहन करतात. उत्सवात संगीताला अनन्यसाधारण महत्व असते. संगीताशिवाय जीवन व्यर्थ आहे म्हणून या उत्सवात ढोल-ताशे, भजन, संगीत यांचा गजर केला जातो. फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव कायद्याच्या चाकोरीत राहूनच केला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.दुर्गोत्सव साजरा करताना पोलिसांकडून व नगर परिषदेकडून सुचविलेल्या सूचनांचे पालन केले जाते. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमावर वर्गणीचे पैसे खर्च करण्यावर आता भर दिला जात आहे. बंगाली असोसिएशनतर्फे दरवर्षी ३०० ते ५०० रोपट्यांचे रोपण केले जाते. सोबतच मोठ्या डॉक्टरांना पाचारण करून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते, असे सुसेनजीत शाह म्हणाले. वल्लभभाई दुर्गा उत्सव समितीकडून ५ हजार लोकांना महाप्रसाद दिला जात असल्याचे मयूर दरबार म्हणाले. ५१ वर्षांपासून या दुर्गादेवीची स्थापना आमच्या मंडळाकडून करण्यात येत आहे. रूग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही आमच्या मंडळाकडून पुढाकार घेत असल्याचे महेंद्र जैन म्हणाले. आम्ही आपल्या दुर्गा उत्सव समितीतर्फे ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना भोजन, भेटवस्तु देत असतो. सोबतच मुलींना सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. एकंदरीत नवदुर्गा उत्सव आनंददायी प्रेरणा देणारा असल्याने प्रत्येक जाती-धर्मांचे लोक या उत्सवात हिरीरीने भाग घेतात. संपूर्ण नऊ दिवसांचा कालावधी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघतो. गोंदिया शहरातील दुर्गा उत्सव मंडळाच्या सदस्यांना नगर परिषदेकडून मोठा त्रास असतो. नगर परिषदेकडून स्वच्छता होत नसल्यामुळे तसेच बेवारस जनावरांच्या मुक्ता संचारामुळे मोठी घटना घडण्याचे सावट नेहमीच डोक्यावर असते, त्याकडे न.प.प्रशासने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)