ट्रकच्या धडकेत आई ठार, मुलगा गंभीर
By Admin | Updated: May 19, 2014 23:47 IST2014-05-19T23:47:15+5:302014-05-19T23:47:15+5:30
अमरावती-नागपूर महामार्ग क्र.६ वर कारंजा येथून आगरगांवला जाताना नागलवाडी शिवारातील मिश्रा धाब्याजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली,

ट्रकच्या धडकेत आई ठार, मुलगा गंभीर
कारंजा(घा.) : अमरावती-नागपूर महामार्ग क्र.६ वर कारंजा येथून आगरगांवला जाताना नागलवाडी शिवारातील मिश्रा धाब्याजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली, तर तिचा १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील लिंगा मांडवी येथील रहिवासी हल्ली मुक्काम कारंजा वॉर्ड नं.६ येथील वैभव वसंता डोंगरे व त्याची आई रंजना डोंगरे (३५) हे दोघेही हिरो होंडा क्रमांक एम.एच.३१ बि.एन.९३१२ ने आगरगांवला जात असतांना भरधाव वेगाने येत असलेला अज्ञात ट्रकने च्या वाहनाला मागावून जबर धडक दिली यात रंजना वसंता डोंगरे या महिलेचा जागीच मृत्यु झाला, तर मुलगा वैभव डोंगरे जखमी झाला. जखमी वैभवला तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृतीसुध्दा चिंताजनक असल्याचे कळते.