मान्सूनचे वेध; बळीराजाने दिला मशागतीला वेग
By Admin | Updated: May 18, 2014 23:50 IST2014-05-18T23:50:48+5:302014-05-18T23:50:48+5:30
मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे.

मान्सूनचे वेध; बळीराजाने दिला मशागतीला वेग
ंतळेगाव (टालाटुले) : मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे. यामुळे लग्नसमारंभ आटोपून बळीराज दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. अशात आकाशात ढग दाटत असल्याने त्याची चिंता वाढली आहे. मध्येच पाऊस आल्यास त्याच्या श्रमावर पाणी पाणी फेरण्याची भीती त्याला आहे. यामुळे बळीराजाने त्याच्या कामाला वेग दिला आहे. गत हंगामात झालेल्या अतिवृष्टीने दिलेल्या जखमा आजही कामय आहेत. या जखमांची सल बाजूला ठेवून शेतकरी नव्या हंगामात व्यस्त झाला आहे. यंदाचा हंगाम तरी आपल्याला योग्य रहावा या आशेत तो कामाला लागला आहे. यावर्षी तरी आपल्याला अधिकाधिक उत्पन्न व्हावे. गत वर्षी झालेले नुकसान यातून भरून काढण्याच्या हिंमतीने तो कामाला लागला आहे. त्याची मशागतीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्याने नव्या हंगामाकरिता बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास शेतकरी व्यस्त झाला आहे. गत हंगाम हातचा गेल्याने त्याच्या पदराला दोन काहीच शिल्लक राहिले नाही. अशात जिल्ह्यात मध्यवर्ती बँक पुरती बंद झाली. यामुळे बँकेत पडून असलेल्या त्याच्या ठेवी पडून आहेत. त्याचाच पैसा त्याच्या कामी येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी सावकाराकडे नतमस्तक होत असल्याचे चित्र खेड्यात आहे. यावर्षी ३० किलो सोयाबीनची बॅग अडीच हजाराच्या घरात गेली आहे. यामुळे कामय पेरावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कृषिकेन्द्र चालक बियाण्याने भरले असून शेतकरी येण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकर्याजवळ पैसे नाही. उधार घेतले तर कृषिकेंद्राकडून त्याची लूट होत आहे. (वार्ताहर)