जलयुक्तची कामे पावसाळ्यापूर्वी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:28 IST2019-05-12T21:28:05+5:302019-05-12T21:28:48+5:30
जलयुक्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे संबधित यंत्रणाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. शिवाय प्रगतीपथावर असलेल्या कामांना गती द्यावी. तसेच ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली, अशा कामाच्या तात्काळ निविदा काढण्याची कार्यवाही करुन कार्यारंभ आदेश निर्गमित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या आहेत.

जलयुक्तची कामे पावसाळ्यापूर्वी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलयुक्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेली विविध कामे संबधित यंत्रणाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. शिवाय प्रगतीपथावर असलेल्या कामांना गती द्यावी. तसेच ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली, अशा कामाच्या तात्काळ निविदा काढण्याची कार्यवाही करुन कार्यारंभ आदेश निर्गमित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या आहेत.
जलयुक्त शिवार अभियानच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृती अधिकारी डॉ. विद्या मानकर, जि.प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, कृषी विभागाचे उपसंचालक कापसे व संबधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच त्यांच्या प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती. २०१७ व २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आलेल्या कामांचा आढावा यावेळी जिल्हधिकाºयांनी जाणून घेतला. पावसाळा सुरु झाल्यावर शेतात पाणी साचून राहते व शेतकºयांचे पीक शेतात उभे राहत असल्याने त्या दिवसात जलयुक्त शिवार मधील कामे करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. बजाज फाऊंडेशन व सदभावना ग्रामीण विकास संस्थेमार्फत करण्यात येणाºया कामांना त्यांच्या कामाचे मॅपींग करुन द्यावे, असे यावेळी भिमनवार म्हणाले. २०१७-१८ मध्ये कृषी विभाग, सिंचन विभाग (जि.प.) जलसंधारण विभाग (लघुसिंचन), भूजल विकास यंत्रणा, वनविभाग, बजाज फाऊडेशन अशा विविध यंत्रणे मार्फत १४४ गावामध्ये १,४०४ कामे घेण्यात आली. १,४०२ कामे पूर्ण झाली तर २ कामे प्रगतीपथावर आहे. तसेच २०१८-१९ मध्ये १९० गावामध्ये १ हजार १९६ कामे हाती घेण्यात आली. यापैकी ९४८ कामे पूर्ण झाली. २४८ कामे प्रगतीपथावर आहे. तर मंजूर आराखड्यानुसार उर्वरित कामांच्या निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी सांगितले.