शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाच्या याद्या गहाळ

By admin | Updated: February 9, 2015 23:17 IST

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़

आष्टी (श़) : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमाल उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत जाहीर झाली़ यामुळे महसूल यंत्रणा याद्या करण्यात व्यस्त झाली. या याद्या बँकांना पाठविल्याचे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात मात्र बँकांमध्ये याद्या पोहोचल्याच नसल्याचे बँक अधिकारी बोलत आहे़ यामुळे याद्या गहाळ झाल्या वा त्या तयारच झाल्या नाही, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आष्टी तालुक्यात २६ हजार शेतकरी हे एक हेक्टरवरील तर ९ हजार ३०० शेतकरी अल्पभूधारक आहेत. गतवर्षी कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी निराश झाले़ याच नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ या नुकसानीची दखल घेत शासनाने सरसकट मदत वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला. प्रारंभी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले़ केंद्राकडूनही मदत मागण्यात आली़ महसूल यंत्रणेला त्वरित मदत वाटपाचे निर्देश देण्यात आले; पण मदत वाटप अद्यापही झालेच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ थोडीफार मदत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; पण ती फोलच ठरत आहे़ अतिवृष्टीच्या मदत वाटपात शासनानेच घोळ घालून ठेवल्याचे समोर आले आहे. अनेक तलाठ्यांनी गतवर्षीच्या जुन्याच याद्या पाठविल्याने खरे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते़ ज्यांचे नुकसान झाले, त्यांना मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; पण यातही गौडबंगाल होत असलयचेच दिसून येत आहे़ यामुळे शासनाने निधी वाटपाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.(प्रतिनिधी)