मिरणनाथ महाराज संस्थानवर देवस्थानच्या दोन गटांचा दावा
By Admin | Updated: November 29, 2014 23:24 IST2014-11-29T23:24:50+5:302014-11-29T23:24:50+5:30
हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान व सर्वधर्म समभावाचे प्रतिक श्री संत मिरणनाथ महाराज देवस्थानवर दोन वेगवेगळ्या गटाने हक्क सांगितला आहे. देवस्थान ट्रस्टवर हक्क सांगणाऱ्या दोन्ही गटाच्या स्वयंघोषित

मिरणनाथ महाराज संस्थानवर देवस्थानच्या दोन गटांचा दावा
देवळी : हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान व सर्वधर्म समभावाचे प्रतिक श्री संत मिरणनाथ महाराज देवस्थानवर दोन वेगवेगळ्या गटाने हक्क सांगितला आहे. देवस्थान ट्रस्टवर हक्क सांगणाऱ्या दोन्ही गटाच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी १३६ व्या पुण्यतिथी महोत्सवावर अधिकार सांगत पत्रकबाजी केल्याने गोंधळ उडाला़़ शासनाने या बाबीची गंभीर दखल वाद सोडवावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.
२७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्र्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी एका गटाचे पुंडलिक उघडे व उदय काशीकर यांनी सुदाम महाराज घवघवे तर दुसऱ्या गटाचे किशोर फुटाणे व दिनकर अंबरकर यांनी सुरेंद्र महाराज मुळे यांचा श्रीमद् भागवत सप्ताह व धार्मिक कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केला. येथून खऱ्या अर्थाने वादाला तोंड फुटले; पण वेळेपर्र्यंत देवस्थानच्या एका गटाने माघार घेतल्याने घवघवे यांच्या भागवत प्रवचनाने पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला़
देवस्थान कमिटीचा सर्वाधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा दोन्ही गटात मागील वर्षापासून तणावाची स्थिती निर्माण करीत आहे. आरोप-प्रत्यारोप व धमक्यांबाबत यापूर्वी दोन्ही गटांनी पोलिसांत तक्रार केली आहे़ १८७८ पासून पुण्यतिथी महोत्सवाची परंपरा आहे. प्रारंभी शिवराम महाराज व नंतर रामजी व किशोर फुटाणे यांनी वंशपरंपरेचा घटनात्मक आधार घेत देवस्थान कमिटीचे कामकाज पाहिले; पण १० वर्षांपूर्वी देवस्थानची सात सदस्यीय कार्यकारिणी गठित झाली़ यात पुंडलिक उघडे यांची अध्यक्षपदी, किशोर फुटाणे यांची सचिवपदी तर ट्रस्टी म्हणून उदय काशीकर व इतर ४ जणांची निवड झाली; पण सध्या देवस्थान कमिटीचे ४ ट्रस्टी मृत झाल्याने उर्वरित ट्रस्टी उघडे, काशीकर व फुटाणे यांच्यात सरळ दोन गट पडले. दोन्ही गटांनी धर्मदाय आयुक्तांकडे वेगळ्या कमिट्या गठित करून चेंज रिपोर्ट पाठविले़ यात शासकीय हस्तक्षेप गरजेचा झाला असल्याचे बोलले जात आहे़(प्रतिनिधी)