शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा राग, प्रियकरानं भेटायला बोलावलं अन्...; वर्ध्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 08:40 IST

आर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम होतं. घटनेच्या दिवशी हा तरुण आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी यांटी भेट झाली होती.

वर्धा: वर्ध्यातील आर्वी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा चार दिवसांनी उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी प्रेमप्रकरणाचा धागा पकडून आरोपीला शोधून अटक करण्यात आली आहे. 

अजय आत्राम असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं आर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम होतं. घटनेच्या दिवशी हा तरुण आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी यांटी भेट झाली होती. त्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत बोलत असल्याच्या कारणातून दोघांत वाद झाला आणि त्यानंतर प्रियकराने मुलीला जवळ असणाऱ्या विहीरीत ढकलून तिची हत्या केली. या प्रकरणाचा उलघडा चार दिवसांनंतर झाला आहे. चार ते पाच दिवसांनी या खुनाचा उलगडा होऊन मारेकरी प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

वर्ध्यातील कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील पीडितेवर अत्याचार करुन तिला गोळ्या देत गर्भपात केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या घटनेने समाजमन्न सुन्न झाले. अवघ्या दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या पीडितेला कमलेश नामक युवकाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष देत तिच्यावर तब्बल दोन वर्षे अत्याचार केला.

यात पीडितेला गर्भधारणा झाली. दरम्यान कमलेशने तिला अनधिकृतरित्या गोळ्या देत गर्भपात केला. पीडितेने लग्नाची गळ घातली असता तिला वारंवार त्रास देत मारण्याची धमकी दिली. तसेच लग्न करण्यास नकार दिला. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार कारंजा पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी कमलेशविरुद्ध कलम ३७६, ३, ३१३,३२३, ५०६ भादवी सहकलम ४,६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र