अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 14:42 IST2018-11-16T14:42:11+5:302018-11-16T14:42:18+5:30
सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागपूर-मुंबई रेल्वे रुळाशेजारी असलेल्या छोट्या तलावात मासे पकडत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला मासे पकडून देतो, असे आमिष देऊन त्याला एकांतात नेत त्याच्यावर अज्ञात तरुणाने बळजबरी अनैसर्गिक कृत्य केले.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणारा जेरबंद
वर्धा : सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागपूर-मुंबई रेल्वे रुळाशेजारी असलेल्या छोट्या तलावात मासे पकडत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला मासे पकडून देतो, असे आमिष देऊन त्याला एकांतात नेत त्याच्यावर अज्ञात तरुणाने बळजबरी अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकरणातील आरोपीला मोठ्या शिताफीने हुडकून काढून त्यास नागपूर येथून ताब्यात घेत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. अवकाश उर्फ भुऱ्या प्रकाश चट्टे (२०) रा. मदनी दिंदोडा, ह.मु. नागपूर, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.