टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:24 IST2019-02-21T00:23:39+5:302019-02-21T00:24:41+5:30

जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे.

Mineral water business in short duration | टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला

टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला

ठळक मुद्देशुद्धतेवरही प्रश्नचिन्ह : पाण्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे. पहाटेपासूनच पाण्याचे कॅन भरलेले आॅटो शहरात व ग्रामीण भागात फिरताना दिसून येत आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांमध्ये पाचशेवर अधिक मिनरल वॉटर विकणारे दुकानदारी थाटून आहेत. यातील अनेकांकडे अन्न औषध प्रशासनाकडून परवानाही नाही. नागरिकांना विहिरी व बोरवेलचे पाणी काढून थंड करून ते विकण्याचा गोरस धंदा जोरात सुरू आहे. पुर्वी साधारणत: १५ ते २० रूपयाला विकली जाणारी पाण्याची कॅन आज ३० ते ४० रूपयावर गेली आहे. घ्यायची असेल तर घ्या, असा दम ग्राहकांना दिला जात आहे. घरपोच पाणी पुरवठ्याचा हा धंदा ग्रामीण भागातही जोरात आहे.
कुणाचेही नियंत्रण नाही
मिनरल वॉटर विकणाऱ्या कंपनीत मनुष्यबळाचा वापरच केला जात नाही. आॅटोमेशन मशीनद्वारे आपोआप पाणी शुध्द करून ते कॅनमध्ये भरले जाते. यात मनुष्याचे हात, डोके आदीचे केस पडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. तसेच अन्न, औषध प्रशासनाकडून पाण्याचे नमूने वारंवार तपासून घ्यावे लागतात. त्यांची परवानगी हा व्यवसाय उघडण्यासाठी घ्यावी लागते. मात्र वर्धा शहरात या सर्व निकषाचे पालन करणारे मोजकेच पाणी विक्री करणारे आहे. बाकी इतरत्र सर्वत्र मिळेल ते पाणी ग्राहकांना थंड करून विकण्याचा धंदा सुरू आहे. यावर जिल्हा प्रशासनासह अन्न औषध प्रशासनाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
पाणी विक्रेत्यांनी परिसर घेतले वाटून
या मिनरल वॉटर विकणाऱ्या विक्रेत्यांनी आपआपले परिसर वाटून घेतले आहे. त्यामुळे इतरांच्या भागात दुसरे विक्रेते जात नाही. ग्राहकांना नाईलाजास्तव महागाचे पाणी खरेदी करावेच लागते. या कामासाठी ठेवण्यात आलेले तरूण नवे ग्राहक शोधण्याचे काम करीत असतात. काहींची तर पाणी फॅक्टरी त्यांच्या इतर व्यवसायाच्याच दुकानात थाटण्यात आली आहे. तेथूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामपंचायत प्रशासनाकडेही अशा व्यवसायिकांच्या नोंदी नाही.

Web Title: Mineral water business in short duration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.