शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

टाकी विक्रीतून बाजारपेठेत कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:17 PM

पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा परिणाम : तिपटीने वाढली विक्री; जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत दोन उद्योग

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे. एकट्या मार्चमध्ये ३,५०० टाक्या खरेदी करण्यात आल्याने बाजारपेठेत टाकी विक्री व्यवसायाने कोटींची उड्डाणे घेतल्याचे चित्र आहे. काही वर्षांपेक्षा यावर्षी तिपटीने विक्री वाढल्याची अधिकृत माहिती आहे.अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात जलसंकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये जूनपर्यंत पुरेल एवढाच उपयुक्त जलसाठा आहे. अल्पसा जलसाठा असल्याने शहरात सात दिवसांआड तर लगतच्या ग्रामीण भागात तब्बल पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून फार विलंबाने आणि तोही अल्प पाणीपुरवठा होत आहे. यातच शहरातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला कूपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत.शहरात आणि ग्रामीण भागात दररोज मोठ्या प्रमाणावर विंधनविहिरी केल्या जात आहेत. मात्र, २०० ते २५० फूट खोदूनही पाणी लागत नाही, अशी स्थिती आहे. गावातील विहिरी आणि शहरालगतच्या भागात शेती असलेल्या नागरिकांना तेथील विहिरीवरून पाणी आणत साठवावे लागत आहे. मात्र, घरची भांडीही अपुरी पडत असल्याने टाकी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गत काही वर्षांच्या तुलनेत शहरात पहिल्यांदाच पाण्याच्या टाकीची विक्रमी विक्री झाली आहे. केवळ मार्च महिन्यांत २५.५० लाख लिटर पाण्याच्या टाकीची विक्री झाली आहे.सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत टाकी निर्मितीचे दोन कारखाने आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने शिवाय मालही वेळीच उपलब्ध होत असल्याने येथूनच टाकी खरेदीला वर्ध्यातील व्यावसायिक पसंती देतात. शहरात टाकी विक्री करणारे १० ते १५ व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडे ३००, ५००, ७५० आणि १ हजार, १ हजार ५०० आणि दोन हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या टाकी २ थर, तीन थर प्रमाणे उपलब्ध आहेत.केमिकलच्या ड्रमचाही वापरअनेकांना कंपन्यांच्या टाक्या घेणे परिस्थितीमुळे शक्य होत नसल्याने त्यांच्याकडून केमिकलकरिता वापरल्या जाणाºया प्लास्टिक ड्रमची पाणी साठवणुकीकरिता खरेदी केली जात आहे. हे ड्रम बाजारपेठेतील पटेल चौक, इतवारा बाजार परिसरात २५०, ३०० आणि ४५० रुपयांत उपलब्ध होत असून हा खर्च सर्वसामान्यांना झेपावणारा आहे. या ड्रमचीही मागणी प्रचंड वाढली आहे.पाणीटंचाईमुळे यंदा पाण्याच्या टाक्यांची गत काही वर्षांच्या तुलनेत मोठी मागणी वाढली आहे. यावर्षी केवळ मार्च महिन्यात टाक्यांची तीन पटीने विक्री झाली. पुढे मे महिना आहे. टाक्यांची आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे.फिदा हुसेन अलीभाईव्यावसायिक, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई