सेवा सहकारी संस्था उभारणार व्यापारी संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:49 IST2019-06-19T22:49:08+5:302019-06-19T22:49:35+5:30
स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यकारी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाचा प्रारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला.

सेवा सहकारी संस्था उभारणार व्यापारी संकुल
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यकारी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाचा प्रारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद आदमने होते. अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती नंदू वैद्य, व नगरसेवक विजय गोमासे यांची उपस्थिती होती.
खासदार रामदास तडस यांनी गावातील लोकांनी केलेला सन्मान सर्वोच्च असल्याचे सांगितले. मागील पाच वर्षात अनेक विकासकामे हाती घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये लोअर वर्धा प्रकल्पाच्या कामाला मिळालेली गती महत्त्वपूर्ण ठरली, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेच्यावतीने खा. तडस भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन संस्थेचे उपाध्यक्ष शाम घोडे यांनी केले. आभार संचालक प्रकाश कारोटकर यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक संतोष मरघाडे, श्रीकांत येनुरकर, सुरेश तायवाडे, प्रकाश देशमुख, सुनील पिपरे, संजय परीसे, शंकर बेंडे, राधा उगेमुगे, सुशीला पिपरापुरे, नानाजी लाकडे, जब्बार तंवर, कृष्णराव कामडी, सुभाष पावसेकर यांची उपस्थिती होती.