शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस अंतिम वर्षाचा क्लिनिकल विषय ‘न्यायवैद्यक शास्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 10:45 IST

भारतीय वैद्यक परिषदेने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य सेवा संचालनालय दिल्ली यांच्या सल्ल्यानंतर सुमारे २१ वर्षांनी एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम तयार केला.

ठळक मुद्देएमसीआयची माहिती २१ वर्षांनंतर नवीन अभ्यासक्रम प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय वैद्यक परिषदेने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य सेवा संचालनालय दिल्ली यांच्या सल्ल्यानंतर सुमारे २१ वर्षांनी एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम तयार केला. तो प्रकाशित करण्यासाठी पावले उचलली जात असल्याची माहिती एमसीआयने आरटीआय अंतर्गत डॉ. इंद्रजीत खांडेकर यांना २ एप्रिल रोजी दिली.२०१० पासून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्रामच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रा.डॉ. खांडेकर न्यायवैद्यक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल व्हावे म्हणून काम करीत आहेत. डॉक्टरकडून सध्या होणारी निकृष्ट दर्जाची न्यायवैद्यक कामे व त्यामुळे होणारी न्यायदानाची गफलत थांबावी म्हणून डॉ. खांडेकर यांनी स्वत: नागपूर उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल केल्या होत्या. शिवाय तत्सम बदलाची गरज दर्शविणारा ४६४ पानी अहवाल आरोग्य मंत्रालय व एमसीआयला पाठविला होता. यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी व पी.आर. बोरा यांनी डॉ. खांडेकरांच्या सूचनांवर कार्यवाहीचे निर्देश एमसीआयला दिले होते. त्यानुसार एमसीआय शैक्षणिक समितीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी डॉ. खांडेकरांना सविस्तर चर्चेसाठी २०१४ मध्ये आमंत्रित केले होते.डॉक्टरकडून दिल्या जाणाऱ्या न्यायवैद्यक सेवेचा दर्जा सुधारावा म्हणून मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पलानिवेलू यांनीही एमसीआयला महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. न्यायवैद्यक शास्त्र विषयाचा सध्याचा अभ्यासक्रम हा परंपरेने सैद्धांतिक आहे; पण एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला या विषयाचे व्यावहारिक ज्ञान देणे गरजेचे आहे. जेणेकरून तो त्याच्या न्यायवैद्यक जबाबदाऱ्या योग्यरित्या पूर्ण करू शकेल, न्यायदान प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावू शकेल, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. हा आदेशही डॉ. खांडेकर यांनी एमसीआयच्या निदर्शनास आणून दिला होता.

या तीन बाबी केल्या अंतर्भूतआरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमातील काही सूचना एमसीआयने मान्य करीत त्यावर अंमल केला.१) न्यायवैद्यक शास्त्राला एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिफ्ट करून क्लिनिकल विषय तयार केला.२) एका पेपरचे दोन पेपर करण्यात आले.३) न्यायवैद्यक बाबींचे प्रात्यक्षिक शिकविण्यावर भर देण्यात आला. न्यायवैद्यक शास्त्र विषयात इंटर्नशिप वैकल्पिक न ठेवता बंधनकारक करावी या सूचनेवर काय कार्यवाही झाली, ते मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

एमबीबीएसचा अभ्यासक्रम थेरॉटिकली उत्कृष्ट असला तरी न्यायवैद्यक सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी काही बदल गरजेचे होते. याबाबत शासन, आरोग्य मंत्रालय व एमसीआयला अहवाल पाठवून जनहित याचिकाही दाखल केली होती. त्याचे फलित मिळाले असून अभ्यासक्रमात बदल होत आहेत. नवीन अभ्यासक्रमाचे प्रकाशनही लवकरच होत असल्याचे एमसीआयने कळविले आहे.- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक शास्त्र विभाग, म.गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र