लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या काळात बॅँकाद्वारे मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट सेक्टरला कर्ज दिले जात आहे. त्याच्या जाणीवपूर्वक ऋण परत न करण्याच्या इच्छेमुळे बॅँकांच्या अकार्यक्षम मालमत्तेत (एनपीए) प्रामुख्याने वाढ होत आहे. शासनाचे सक्रियता व न्यायप्रणालीद्वारे तातडीने कार्यवाही केल्यास ही समस्या आटोक्यात आणता येते. बॅँक ही सामान्य जनतेसाठी कार्य करते म्हणून सर्व कर्जदारांनी आपली नैतिक जबाबदारी समजून वेळेवर ऋण परत करावे, असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बॅँकेचे वरिष्ट अधिकारी आय.जी. भिवगडे यांनी केले.स्थानिक यशवंत महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यासमंडळाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. बॅँकेचे वाढते एनपीए या विषयावर अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते. त्यांनी मार्गदर्शन करताना बॅँकेचे महत्व देशाकरिता किती महत्वाचे आहे हे मुलांनी स्वत: लक्षात घ्यावे. तसेच वाढत्या एनपीए चा देशाच्या प्रगतीवर काय परिणाम होत आहे, याचे स्वत: परिक्षण करणे आवश्यक आहे, मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आशा अग्निहोत्री यांनी केले. अभ्यासमंडळाचे महत्व, उद्देश, शैक्षणिक कार्य, याबद्दल त्यांनी माहिती दिली. अर्थ शास्त्र अभ्यासमंडळ राबवित असलेल्या सर्व कार्यक्रमाची माहिती विषद केली. तसेच कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभागाचे प्रा. संदीप चव्हाण, प्रा. सुरज पोपटकर, प्रा. स्नेहल मदनकर उपस्थित होते. अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून संघपाल मून, उपाध्यक्ष पल्लवी चंदनखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अंकिता जांभूळकर तर आभार प्रदर्शन निवेदिता फुसाटे यांनी केले. कार्यक्रमाला अर्थशास्त्राचे विद्यार्थी उपस्थित होते.
बॅँकाचे वाढते एनपीए प्रमाण चिंंतेची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:02 IST
सध्याच्या काळात बॅँकाद्वारे मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट सेक्टरला कर्ज दिले जात आहे. त्याच्या जाणीवपूर्वक ऋण परत न करण्याच्या इच्छेमुळे बॅँकांच्या अकार्यक्षम मालमत्तेत (एनपीए) प्रामुख्याने वाढ होत आहे. शासनाचे सक्रियता व न्यायप्रणालीद्वारे तातडीने कार्यवाही केल्यास ही समस्या आटोक्यात आणता येते.
बॅँकाचे वाढते एनपीए प्रमाण चिंंतेची बाब
ठळक मुद्देआय.जी. भिवगडे : अभ्यासमंडळाचे उद्घाटन