धारदार शस्त्राने मारहाण करणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:16+5:30
रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६३४/२०१९ अन्वये गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे व आकाश राजू हरणे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धारदार शस्त्राने मारहाण करणारे जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धारदार शस्त्रने मारहाण करून जखमी करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे. सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे (२८) रा. आदिवासी कॉलनी वर्धा व आकाश राजू हरणे (२८) रा. बुरांडे ले-आऊट, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक चाकू व दुचाकी जप्त केली आहे. सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर आरोपींना रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६३४/२०१९ अन्वये गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे व आकाश राजू हरणे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, यांच्या मार्गदर्शनात महेंद्र इंगळे, निरंजन वरभे, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टांनकर यांनी केली.