शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

विवाहितेची छेड काढणे बेतले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 5:00 AM

हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड भागातील रहिवासी अविनाश राजू फुलझेले हा २७ ऑक्टोबरला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. अशातच २८ रोजी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोनेगाव (स्टे.) शिवारात आढळून आला. या प्रकरणी सुरूवातीला अल्लीपूर पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम ३०२ व २०१ अन्वये गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देदोघांना अटक : सोनेगाव येथील हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरून बेपत्ता असलेल्या अविनाश राजू फुलझेले याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेगाव (स्टेशन) शिवारात एका शेतात आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विवाहितेची छेड काढल्यानेच आम्ही अविनाशला जीवानीशी ठार केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड भागातील रहिवासी अविनाश राजू फुलझेले हा २७ ऑक्टोबरला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. अशातच २८ रोजी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोनेगाव (स्टे.) शिवारात आढळून आला. या प्रकरणी सुरूवातीला अल्लीपूर पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम ३०२ व २०१ अन्वये गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात करण्यात आली. याच दरम्यान पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. अशातच अविनाश सोबत आणखी दोन व्यक्तींना बघितल्या गेले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी निखील प्रभाकर ढोबळे (२८) व सुधीर उर्फे चेतन दिलीप जवादे (३५) यांना टाकळी आणि हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता या दोन्ही संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एम. एच. ३२ ए.ए. ०२०५ क्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोहवा संतोष दरगुडे, गजानन लामसे, शेख हमीद, रंजीत काकडे, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, राजेश जैसिंगपुरे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, गोपाल बावणकर, मनिष कांबळे, नवनाथ मुंडे, अमोल ढोबळे, प्रदीप वाघ यांनी केली. आरोपींना अल्लीपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.मद्यधुंद अवस्थेत ह्यअविनाशह्णला नेले घटनास्थळीया प्रकरणातील आरोपी निखील ढोबळे व सुधीर उर्फे चेतन जवादे या दोघांनी पूर्वीपासून ओळख असलेल्या अविनाश फुलझेले याला मद्यधुंद अवस्थेत सोनेगाव (स्टेशन) शिवारात नेले. तेथे या दोन्ही आरोपींनी अविनाशवर दगडाने जबर प्रहार करून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :Murderखून