नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ शहरात मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:34+5:30
नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीसह शहरातील हिंदुत्ववादी व विविध संघाटनांच्यावतीने शहरातून मार्च काढण्यात आला. ‘वंदे मातरम् आणि भारत माता की जय’ च्या घोषणा देत निघालेल्या या मार्चने शहरातून मार्गक्रमण केले. स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरुन दुपारी या मार्चची सुरुवात करण्यात आली. तेथून निघालेला हा मार्च शिवाजी चौकातून पावडे चौक, वंजारी चौक, सोशालिस्ट चौकातून मुख्यमार्गाने जात केसरीमल शाळेच्या मैदानातच या मार्चचा समारोप करण्यात आला.

नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ शहरात मार्च
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीसह शहरातील हिंदुत्ववादी व विविध संघाटनांच्यावतीने शहरातून मार्च काढण्यात आला. ‘वंदे मातरम् आणि भारत माता की जय’ च्या घोषणा देत निघालेल्या या मार्चने शहरातून मार्गक्रमण केले.
स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरुन दुपारी या मार्चची सुरुवात करण्यात आली. तेथून निघालेला हा मार्च शिवाजी चौकातून पावडे चौक, वंजारी चौक, सोशालिस्ट चौकातून मुख्यमार्गाने जात केसरीमल शाळेच्या मैदानातच या मार्चचा समारोप करण्यात आला. या मार्चमध्ये भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासह विविध हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकही सहभागी झाले होते. या मार्चमध्ये शंभर मीटर लांबीचा तिरंगा घेऊन देशातील अखंडतेचे दर्शन घडविले.
यात खासदार रामदास तडस, माजी खासदार विजय मुडे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा अर्चना मुडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरसेवक वरुण पाठक, नगरसेवक निलेश किटे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, गुंडू कावळे, श्रीधर देशमुख, नगरसेविका श्रेया देशमुख, गटनेता प्रदीप ठाकरे, माजी नगरसेविका माया उमाटे, हर्ष तिवारी, सचिन अग्निहोत्री, अमीत ठाकूर, अनुप जयस्वाल, राजेश बकाने, आशीष कुचेवार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महिलांची उपस्थिती
शहरातून निघालेल्या या मार्चमध्ये महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांनीही हाती भगवे झेंडे घेऊन घोषणा देत नागरिकत्व विधेयकाचे समर्थन केले.