अनेक पथदिवे महिन्यांपासून बंदच

By Admin | Updated: July 5, 2015 01:24 IST2015-07-05T01:24:50+5:302015-07-05T01:24:50+5:30

रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली.

Many streetlights are closed for months | अनेक पथदिवे महिन्यांपासून बंदच

अनेक पथदिवे महिन्यांपासून बंदच

वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली.
सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा
प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी)
वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली.
सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Many streetlights are closed for months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.