अनेकांचे देव पाण्यात
By Admin | Updated: July 14, 2014 02:23 IST2014-07-14T02:23:41+5:302014-07-14T02:23:41+5:30
नगराध्यक्षाच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या

अनेकांचे देव पाण्यात
भास्कर कलोडे हिंगणघाट
नगराध्यक्षाच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आपणच नगराध्यक्ष व्हावे असे वाटू लागले आहे. या स्वप्नपपूर्तीकरिता साऱ्यांनीच देव पाण्यात सोडले आहे; मात्र जिल्ह्यात खासदाराच्या निवडणुकीतील सत्ता बदल व माजी खासदार दत्ता मेघे यांचा भाजप प्रवेश यामुळे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
३३ नगरसेवकांच्या या नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १२ तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून त्यांचे सहा नगरसेवक आहेत. काँग्रेस पाच, भाजपा तीन व मनसेचा एक नगरसेवक आहे. अपक्षाची संख्या आता पुन्हा सहा वर पोहचली आहे. गत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत समीर कुणावार आघाडी म्हणून नोंद केलेले अपक्ष नगरसेवक पंढरीनाथ कापसे, विठ्ठल गुळघाने व जितेंद्र कुकसे या तिघांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत त्यांना अपक्ष समजण्याची मागणी केली.
३३ नगरसेवकांच्या या पालिकेत बहुमतासाठी १७ चा जादूई आकडा जुळवण्याची क्षमता असणाऱ्याची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याने घोडा बाजाराला तेजी यावी म्हूणन अनेक नगरसेवक पाण्यात देव ठेवून बसले आहेत. राकाँचे प्रमुख उमेदवार अॅड.सुधीर कोठारी यांनी मात्र पक्षाने जर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर ती स्विकारण्याचा पवित्रा घेतला आहे. सद्या स्थितीत सर्वाधिक १२ सदस्यांच्या राकाँमध्ये इच्छूकाच्या गर्दीत विद्यमान नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, माजी नगराध्यक्ष हरिदास काटकर, प्रलय तेलंग, शुभांगी डोंगरे, निता धोबे यांनी फिल्डींग लावली आहे.
नगराध्यक्ष पदाच्या गत निवडणुकीत काँगे्रस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होवून राकाँचे सुरेश मुंजेवार यांनी १८ मते घेवून काँग्रेसच्या पुष्पा कटारे यांचा १४ मतांनी पराभव केला होता. कटारे यांना पाच मते मिळाली होती. त्यावेळी माजी खासदार दत्ता मेघे यांनी एकला चलोरेची भुमिका घेतली होती.
आता माजी खासदार दत्ता मेघे भाजपवासी झाले आहेत. यात मतदार क्षेत्राचे आमदार सेनेचे व त्याच्या सोबतीला दत्ता मेघे असल्याने येथे भाजपची सत्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात अपक्षाच्या रांगेत लागलेल्या पंढरीनाथ कपासे भाजपाचे उमेदवार ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे येथील नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.