दुचाकी रस्त्यात अडवून छायाचित्रकारास बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 17:38 IST2021-11-17T17:37:54+5:302021-11-17T17:38:45+5:30
जुन्या वादातून चौघांनी छायाचित्रकाराला रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घाटसावली येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी चौघांना वडनेर पोलिसांनी अटक केली आहे.

दुचाकी रस्त्यात अडवून छायाचित्रकारास बदडले
वर्धा : जुन्या वादातून चौघांनी छायाचित्रकाराला रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घाटसावली येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी चौघांना वडनेर पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संदीप भाऊराव नासरे (रा. दारोडा) यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि माझ्या भाच्याच्या वाढदिवसासाठी तुम्हाला फोटोची ऑर्डर द्यायची असल्याने घाटसावली येथे यावे लागेल, असे सांगितले. संदीप हा दुचाकीने घाटसावली येथे गेला आणि रेट सांगून तेथून निघाला.
दरम्यान, सूरज ईटनकर, अजय शिरपूरकर, आकाश दांडेकर, नागो हातेकर यांनी त्याला रस्त्यात अडवून रॉडने मारहाण करीत जखमी केले. ही बाब संदीप यांनी हिंगणघाट येथील ग्रामीण फोटोग्राफर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर संदीप याने वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली असून, चारही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.