कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाकरिता शहरात जागा उपलब्ध करुन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:37 IST2018-01-02T23:36:49+5:302018-01-02T23:37:52+5:30
वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे.

कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाकरिता शहरात जागा उपलब्ध करुन द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून विजयस्तंभाची निर्मिती केल्यास वनीव पिढीकरिता हे स्मारक प्रेरणादायी ठरेल. प्रशासनाला त्याबाबत निर्देश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कोरेगाव (भिमा) येथील इतिहास सर्वांना कळावा. नवीन पिढीला बलीदानाची ओळख व्हावी याकरिता कोरेगाव (भिमा) शौर्यदिन साजरा करण्यात येतो. या घटनेला २०० वर्षे झाले असून शहरात विजयस्तंभ उभारल्यास ती हुताम्यांना खरी आदरांजली ठरेल. याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर किंवा डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ जागा उपलब्ध करून देण्याचा उल्लेख निवेदनात केला आहे. या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे नमुद केले आहे.
निवेदन देताना युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, चेतना सामाजिक संस्थेचे मयुर डफळे, भीम आर्मीचे आशिष सोनटक्के यासह कुणाल बहादुरे, तुषार उमाळे, आकाश पाझारे, गौरव पानतावणे, पंकज धायवटे, अमर देशमुख, प्रज्वल नाईकवाड आदी उपस्थित होते.