शासकीय वास्तूंची स्वच्छता राखणे प्रत्येकाची जबाबदारी
By Admin | Updated: August 12, 2014 23:56 IST2014-08-12T23:56:02+5:302014-08-12T23:56:02+5:30
इतर तालुक्यातील शासकीय इमारती जनतेकरिता उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. मात्र अशा भव्य वास्तू उभारल्यानंतर त्या इमारतींची स्वच्छता व निगा राखणे

शासकीय वास्तूंची स्वच्छता राखणे प्रत्येकाची जबाबदारी
कारंजा (घा.) : इतर तालुक्यातील शासकीय इमारती जनतेकरिता उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. मात्र अशा भव्य वास्तू उभारल्यानंतर त्या इमारतींची स्वच्छता व निगा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले.
कारंजा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. सरपंच नितीन दर्यापूरकर यांनी कारंजाच्या समस्यांकडे लक्ष वेधत दुबार व तिबार पेरणीकरिता, अतिवृष्टीसाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली. कंत्राटदार पुरुषोत्तम अग्रवाल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मॉडेल हायस्कूलच्या संगीत चमूने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, माजी आमदार अमर काळे, उपजिल्हाधिकारी संजय भागवत, जि.प. बांधकाम सभापती गोपाल कालोकर व महिला व बाल कल्याण सभापती बेबीताई बिजवे, बाजार समितीचे सभापती दिलीप राठी, सरपंच दर्यापूरकर, उपसरपंच गजेंद्र बालपांडे, मेघराज चौधरी, नरेश चाफले, गजभिये, माजी सभापती अरुण बाजारे, जि.प. सदस्य मारोतराव व्यवहारे, पं.स. सदस्य तेजराव बबनगरे, सीतेश्वर भादे, मनोज भांगे, जमालपुरे, किशोर उकंडे संदीप गाटवरे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी चव्हाण यांनी केले. संचालन रवींद्र डोंगरदेव यांनी केले. आभार प्रदर्शन तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी केले.
(तालुका प्रतिनिधी)