मुख्य वितरिकेला भगदाड; पाणी शेतात
By Admin | Updated: December 16, 2014 22:57 IST2014-12-16T22:57:56+5:302014-12-16T22:57:56+5:30
आष्टा मुख्य वितरीकेला भगदाड पडल्याने कालव्यातून सोडलेले बोरधरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या पिकात शिरले आहे. यामुळे त्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. याची तक्रार सदर शेतकऱ्याने येथील

मुख्य वितरिकेला भगदाड; पाणी शेतात
केळझर : आष्टा मुख्य वितरीकेला भगदाड पडल्याने कालव्यातून सोडलेले बोरधरणाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या पिकात शिरले आहे. यामुळे त्याच्या पिकाचे नुकसान होत आहे. याची तक्रार सदर शेतकऱ्याने येथील सिंचन विभागाला दिली असता सदर प्रभाग दहेगाव (गोसावी) क्षेत्रात येतो, त्यामुळे तिथे तक्रार करा असा सल्ला देत अधिकाऱ्यांनी हात वर केले.
सध्या रबी हंगाम सुरू असून याकरिता बोरधरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. आष्टा नावाच्या मुख्य वितरीकेला आष्टा वितरीकेला किनहाळाजवळ मोठे भगदाड पडले. या भगदाडातून पाणी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याच्या शेतातील पीक पाण्याखाली आले आहे. शिवाय यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून परिसराला तलावाचे स्वरूप आलेले आहे. याची माहिती येथील शेतकरी धनंजय थूल यांनी केळझरच्या सिंचन कार्यालयाला दिली असता सदर प्रभाग दहेगाव (गोसावी) क्षेत्रात येत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)