सेवाग्राम आश्रमात देशी बियाण्यांचा प्रचारक ठरला मुख्य आकर्षण
By Admin | Updated: October 3, 2015 01:51 IST2015-10-03T01:51:59+5:302015-10-03T01:51:59+5:30
स्वत:च्या अंगावर विविध प्रकारच्या देशी बियाण्यांच्या माळा घालून शेतकऱ्यांनो स्वत: बियाणे तयार करा.

सेवाग्राम आश्रमात देशी बियाण्यांचा प्रचारक ठरला मुख्य आकर्षण
२५० बियाण्यांची बीज बँक : आई-वडिलांच्या प्रेरणेने देशी बियाण्यांचा प्रचार
वर्धा : स्वत:च्या अंगावर विविध प्रकारच्या देशी बियाण्यांच्या माळा घालून शेतकऱ्यांनो स्वत: बियाणे तयार करा. देशी बियाणे वापरा हा संदेश देणारा प्रचारक गांधी जयंती दिनी सेवाग्राम आश्रमात मुख्य आकर्षण ठरला.
महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सेवाग्राम आश्रमात विविध राज्यातून तसेच विदेशातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक भेट देवून बापू कुटीचे दर्शन घेतात. सेवाग्राम परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलून जातो. याच गर्दीत अंगावर बियाण्यांच्या माळा घातलेला व्यक्ती सर्वांचेच आकर्षण ठरला.
धामणगाव (रेल्वे) तालुक्यातील भिल्ली या छोट्याशा गावाचा शेतकरी रमेश साखरकर सेंद्रीय शेतीच्या सोबत सर्व शेतकऱ्यांनी देशी बियाणेच वापरावे यासाठी जनजागृती अभियान राबवत आहे. २५० प्रकारचे बियाणे आपल्या शेतात तयार करून शेतकऱ्यांनाही देशी बियाणे स्वत: तयार करून वापरावे यासाठी १९९६ पासून प्रचाराला सुरुवात केली आहे. बीज बँकेच्या संकल्पनेबद्दल सांगताना रमेश साखरकर म्हणाले की, वडील राजेराम साखरकर यांनी देशी बियाणेच शेतकऱ्यांनी पेरावे यासाठी ‘नया नौ दिन, पुराना सौ दिन’, याची शिकवण दिली. आई चंद्रभागा यांनी ‘दुर दुर बोना, तो घर मे सोना, पतला पतला बोना सालभर रोना’, विदेशी बियाणे शेतकऱ्यांना उपयुक्त नाही स्वत: बियाणे तयार केल्यास शेतात विविध २५० बियाण्यांचे संवर्धन होईल. आज देशी बियाणे दुर्मिळ होत असल्याची स्वत: त्यांनी व्यक्त केली.देशी बियाण्यांमध्ये दाळ वर्गीय तुरीच्या ११ प्रजाती आहेत. वेल वर्गीय, धान्य वर्गीय, भाजीपाला वर्गीय, कडधान्य वर्गीय, चारा वर्गीय आदी बियाण्यांचे संवर्धन आवश्यक आहे. साखरकर यांच्या तीन एकरात या सर्व बियाण्यांच्या प्रजाती पहायला मिळाल्या. त्यांनी आपल्या शेतात बीज बँक निर्माण केली आहे. देशी बियाण्यांच्या उत्पादनासंदर्भात माहिती देताना कापसाचे एकरी सरासरी नऊ क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले आहे. यासाठी योग्य वेळी पेरणी, मशागत आणि घरचे बियाणे यामुळे उत्पादन घेणे शक्य झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
आई-वडिलांनी दिली शिकवण
वडील राजेराम साखरकर यांनी देशी बियाणेच शेतकऱ्यांनी पेरावे यासाठी ‘नया नौ दिन, पुराना सौ दिन’, याची शिकवण दिली. आई चंद्रभागा यांनी ‘दुर दुर बोना, तो घर मे सोना, पतला पतला बोना सालभर रोना’, विदेशी बियाणे शेतकऱ्यांना उपयुक्त नाही स्वत: बियाणे तयार केल्यास शेतात विविध २५० बियाण्यांचे संवर्धन होईल. आज देशी बियाणे दुर्मिळ होत असल्याची स्वत: त्यांनी व्यक्त केली.
वेल वर्गीय, धान्य वर्गीय, भाजीपाला वर्गीय, कडधान्य वर्गीय, चारा वर्गीय बियाण्यांचे संवर्धन आवश्यक आहे.