विचित्र अपघातात युवती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:39 IST2018-05-14T22:39:20+5:302018-05-14T22:39:20+5:30

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरील युवती अन्य दोघे खाली पडले. दरम्यान येथून जाणारे भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली.

The maiden killed a strange accident | विचित्र अपघातात युवती ठार

विचित्र अपघातात युवती ठार

ठळक मुद्देदोघे गंभीर : नागपूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरील युवती अन्य दोघे खाली पडले. दरम्यान येथून जाणारे भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली.
विश्वंती उर्फ छकुली अरविंद वाटगुळे (१९) रा. सालई (पेवठ) ता. सेलू असे मृत युवतीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दिनेश दिगंबर साखरकर (२५), रा. केळझर व सिंदी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पवन देवगीरकर हे या अपघातात जखमी झाले.
विश्वंती उर्फ छकुली ही तिची वर्गमैत्रिण ज्योतीच्या घरी गेली होती. येथून येण्याकरिता वेळ झाल्याने छकुलीला ज्योतिचा भाऊ योगेश हा दुचाकीने सोडून देण्याकरिता येत होता. दरम्यान केळझरनजीक सिंदी पोलीस ठाण्यातील शिपाई पवन देवगीरकर याच्या दुचाकीची त्या दोघांना धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर पडले. अशातच नागपूरकडे जाणारी एक कार त्यांच्या अंगावरून गेली. यात विश्वंती उर्फ छकुली हिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: The maiden killed a strange accident