शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विजेची तार तोंडात धरून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या, मदतीच्या प्रतीक्षेत गेला आणखी एक जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 06:01 IST

यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर केंद्रीय पथक, तर शुक्रवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली.

वर्धा :

यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर केंद्रीय पथक, तर शुक्रवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट जिवंत विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गणेश श्रावण माडेकर (वय ३६, रा. पढेगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यांतर्गत पढेगाव येथील गणेश माडेकर यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. त्यांनी तूर, सोयाबीन व कपाशीची लागवड केली. अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीला पूर आला. त्यात माडेकर यांच्या शेतातील संपूर्ण पीक खरडून गेले. नेत्यांसह केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी केल्याने लवकरच शासकीय मदत मिळेल, अशी आशा त्याला होती; पण हवालदिल झालेल्या गणेश यांचे मनोधैर्य खचले. त्यातच त्यांनी प्रवाहित वीज तार तोंडात धरून जीवनयात्रा संपविली. सावंगी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

पढेगावावर पसरली शोककळागणेश माडेकर याच्या पश्चात पत्नी, आठ वर्षीय मुलगा, सहा वर्षीय मुलगी तसेच वयोवृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. गणेशच्या आत्महत्येमुळे माडेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, पढेगावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी