शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Maharashtra Election 2019 ; ४ हजार ६९७ दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM

दिव्यांग मतदारांच्या सोईसाठी सर्व मतदान केद्रांवर रॅम्प तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, पुरेशी वीज, प्रतीक्षागृह, शौचालय, फर्निचर आदी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. १६ ऑक्टोंबर रोजी नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग सहाय्यकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे९२२ व्हीलचेअर उपलब्ध । ३ हजार ३१२ दिव्यांग सहाय्यक नियुक्त, सुविधा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील ४ हजार ६९७ दिव्यांग मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक दिव्यांग सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिव्यांग मतदारांना मतदान करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ९२२ व्हीलचेअरसह ३,३१२ दिव्यांग सहाय्यक मतदानासाठी सहाय्य करणार आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आढावा बैठकीत ही माहिती दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड, स्विपचे नोडल अधिकारी व गटविकास अधिकारी आणि सर्व नगरपालिका, नगर पंचायतचे मुख्याधिकारी बैठकीला उपस्थित होते.आर्वी विधानसभा क्षेत्रात १,७३१, देवळी १,०४४, हिंगणघाट १,२२६ व वर्धा विधानसभा क्षेत्रात ६८६ अशा एकूण ४,६९७ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी केंद्रावर ९२२ व्हीलचेअर असणार आहेत. त्याचप्रमाणे ३३१२ दिव्यांग सहाय्यकाची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या गृहभेटीवर भर देण्यात येणार आहे.दिव्यांग मतदारांच्या सोईसाठी सर्व मतदान केद्रांवर रॅम्प तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, पुरेशी वीज, प्रतीक्षागृह, शौचालय, फर्निचर आदी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. १६ ऑक्टोंबर रोजी नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग सहाय्यकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले, अशा मतदान केंद्रांचा कारणासह अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या. मतदान कमी असलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारणमिमांसा करावी, असे ते म्हणाले. या मतदान केंद्रावर मतदान जागृती कार्यक्रम आयोजित करावे. यात नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश असावा असेही त्यांनी सांगितले. मतदान जागृती कार्यक्रमाचा पुढील दहा दिवसाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले नाही, अशा मतदारांच्या भेटी घेऊन विधानसभा निवडणुकीत मतदान करणार असे संकल्पपत्र भरून घेण्यात आले आहे. मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत चारही विधानसभा मतदारसंघात चित्ररथ, पथनाट्य, मतदार रॅली, चुनावी पाठशाला, गृहभेटी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदान जागृती सुरू आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अघिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.

टॅग्स :wardha-acवर्धा