शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

Maharashtra Election 2019: वर्धा जिल्ह्यात ९ जणांची माघार, ४८ उमेदवार रिंगणात; सेना भाजपमध्ये बंडाळी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:07 IST

हिंगणघाट मतदार संघात एकूण १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते

वर्धा- जिल्ह्यात दोन विधानसभा मतदार संघातच ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ मतदार संघात ४८ उमेदवार मैदानात राहिले आहे.  हिंगणघाट व देवळी मतदार संघात प्रत्येकी १४ तर आर्वी व वर्धा मतदार संघात प्रत्येकी १० उमेदवार नशीब अजमावणार आहे. देवळी विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदार संघात आता १४ उमेदवार निवडणुक लढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाºयांमध्ये राजेंद्र गुलाबराव बानमारे, ज्ञानेश्वर गोविंदराव ढगे, रमेश ज्ञानेश्वर टिपले, अजय बाबाराव तिजारे, सुरेश गणपतराव नगराळे यांचा समावेश आहे. या मतदार संघात भाजपचे बंडखोर म्हणून राजेश बकाणे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. 

हिंगणघाट मतदार संघात एकूण १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ४ उमेदवारांनी रिंगणात माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदार संघात १४ उमेदवार मैदानात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाºया प्रमुख उमेदवारांमध्ये राष्टÑवादी कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, लोक जागर पक्षाचे मनिष पांडुरंग नांदे, अपक्ष हेमंत इसनकर, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. या मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. वर्धा व आर्वी मतदार संघात प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात असून एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. 

देवळी व हिंगणघाटमध्ये सेना-भाजपचे बंडखोर कायम

वर्धा जिल्ह्यातील देवळी व हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजप व शिवसेनेच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही. त्यामुळे येथे युतीत आता बंडखोरी झाली आहे. उलट हिंगणघाट मतदार संघात राकॉँ उमेदवाराविरूध्द बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आघाडीतील बंडखोरी शमली आहे. हिंगणघाट मतदार संघात भाजपचे उमेदवार म्हणून समीर कुणावार निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरूध्द शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने या मतदार संघात सेना-भाजप आमने-सामने येणार आहे, अशीच परिस्थिती देवळी मतदार संघात आहे. येथे शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरूध्द भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदार संघात आता भाजपचा बंडखोर मैदानात आहे. उलट शिवसेनेत अलिकडेच दाखल झालेले नाना उर्फ ज्ञानेश्वर ढगे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019