कालौघात महालक्ष्मीचेही रूपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:13+5:30

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महालक्ष्मी पूजनाचा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागासह शहरातही श्रीमंतांपासून तर गोरगरीबही आपापल्या परीने तीन दिवस हा सण साजरा करतात. गौरी पूजन कार्यक्रम नियम आणि प्रथेनुसारच साजरा केला जातो.

Mahalaxmi also changed its course over time | कालौघात महालक्ष्मीचेही रूपडे पालटले

कालौघात महालक्ष्मीचेही रूपडे पालटले

ठळक मुद्देउत्सवाला आधुनिकतेची झालर : साड्यांऐवजी आता नववारीचा साज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सर्वत्रच महालक्ष्मी पूजनाची (गौरी पूजनाची) शतकानुशतकाची परंपरा आहे. ही परंपरा आजही पिढी मोठ्या भक्तीभावाने जोपासत आहे. मात्र, बदलत्या काळात या महालक्ष्मी पूजनालाही आधुनिकतेचा साज चढविला जात आहे. यामुळे महालक्ष्मी पूजनाची तऱ्हा बदलली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महालक्ष्मी पूजनाचा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागासह शहरातही श्रीमंतांपासून तर गोरगरीबही आपापल्या परीने तीन दिवस हा सण साजरा करतात. गौरी पूजन कार्यक्रम नियम आणि प्रथेनुसारच साजरा केला जातो. पहिल्या दिवशी महालक्ष्मी बसविणे, दुसऱ्या दिवशी जेवण आणि तिसऱ्या दिवशी त्या पुन्हा काढून त्यांच्या पेटीत बंद करून ठेवल्या जातात. काही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबील गुळणीचा प्रसाद करतात. याला खूप महत्व आहे. आंबील करीत ज्वारीची आवश्यकता असते; पण आता ज्वारीचे पीक घेणे बंद झाल्याने काहीसा परिणाम जाणवतो. तरी विकतची ज्वारी आणून प्रसाद चढवितातच.
या तीन दिवसात घरात धामधूम असते. कुळातील सर्व सदस्य आणि नातेवाईक या कार्यक्रमाला एकत्र येतात. काही गावात एका घराआड महालक्ष्मी बसतात. त्यामुळे गावात वेगळेच भक्तिमय वातावरण असते. सर्व एकमेकांच्या घरी मदतीलाही जातात. असा हा नियमावलीत बांधलेला सण उत्साहात साजरा करून त्याला कालौघात सजविले जात आहे.

असा बदलत गेला साज
सुरुवातीला महालक्ष्मी मांडण्यासाठी लाकडी पाट आणि त्यावर बांबूच्या सरत्यामध्ये धड असलेले हात बसवून महालक्ष्मी उभी केली जायची. त्यानंतर बांबूच्या सरत्याची जागा लोखंडी ग्रीलच्या कठड्यांनी घेतली. त्याही पुढे जाऊन कुणी दिवानवर, सोफासेटवर तर कुणी बंगळीवर महालक्ष्मीची स्थापना करू लागले. हे करीत असताना हात आणि मुखवटे मांडण्याची पद्धत कायम राखली. आता साऱ्याच बाबतीत शोध लावल्या जात असल्याने चक्क कृत्रिम अवयव तयार करून महालक्ष्मी उभी केली जात आहे. त्यांचा रेखीव चेहरा, हात-पाय आणि त्यावर नववारी साज. हे देखणं रूप भाविकांना भुरळ घालत आहे. त्यात एक आजी एक नात आणि झोल्या-झोली असतात. यातील झोल्या-झोली तर जणू बाहुलेच वाटतात.

Web Title: Mahalaxmi also changed its course over time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.