बोरव्याघ्र प्रकल्पात मध्यप्रदेशातील २२ मजुरांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:04+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच्या कामासाठी दोन महिन्यापासून आणले होते.

बोरव्याघ्र प्रकल्पात मध्यप्रदेशातील २२ मजुरांवर संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : येथील बोरव्याघ्र प्रकल्पातील सुरक्षाभींतीच्या आणि बंधाºयाच्या कामावर कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्यप्रदेशातून आलेल्या २२ मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्याकडे पैसे नसल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी मजुरांकडून करण्यात येत आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच्या कामासाठी दोन महिन्यापासून आणले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने सदर कामे थांबविण्यात आली. दोन्ही कंत्राटदार कामे बंद होताच पसार झाले. पण, त्या २२ मजुरांजवळ पैसे नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. बोरीचे सरपंच विशाल भांगे यांनी बोरव्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी नीलेश गावंडे यांच्याशी चर्चा करून सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांना माहिती देण्यात आली. पण, त्यांच्याकडूनही मजुरांच्या आर्थिक संकटाबाबतची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सरपंच विशाल भांगे, पोलीस पाटील, विकास कोकाटे, गोविंदा पेटकर यांनी पैसे गोळा करून स्व:खर्चाने त्यासर्व मजुरांना धान्यसाठा देण्याचे ठरविले आहे. तसेच त्यांच्या दोन दिवसांच्या जेवणाची व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. पण, दोन दिवसानंतर त्या मजुरांचे काय होणार, त्यांना जेवण मिळेल की नाही, याकडे प्रशासन लक्ष देतील का, त्यांच्या निवासाची व्यवस्था करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
साहेब आम्हाला मदत मिळेल का हो...
‘लॉकडाउन‘ : अडकलेल्या १४ मजुरांचा प्रशासनाकडे टाहो
सेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामावरील बिहार आणि उडिसा येथील १४ व्यक्ती अडकून असल्याने त्यांना कोणतीही मदत अद्यापपर्यंत मिळाली नसल्याने आम्हला मदत मिळेल का, अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
लॉकडाऊन असल्याने जेथे आहे तिथेच थांबा, असा इशारा प्रशासनाने कामगारांसह नोकरदारांना दिला आहे. यात मात्र, परप्रांतीय मजुरांचा समावेश असल्याने आणि काम बंद असल्याने त्यांना गावी कसे जावे, याबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सेवाग्राम आश्रमापुढे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत कामावर असलेले ११ बिहार आणि तीन उडिसा येथील मजूर अडकले आहे. कंत्राटदार देखील त्यांच्या मदतीला आला नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गावाला जाण्याची ओढ त्यांना सतावित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्यातरी त्यासर्व मजुरांना कुठेही जाता येणार नाही. आहे त्याच ठिकाणी त्यांना राहावे लागेल. अडचण असल्यास त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करता येईल.
- कांचन पांडे, पोलीस निरीक्षक सेवाग्राम.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरु असलेल्या कामावर आम्ही आलो होतो. पण, आता गावी जाण्यासाठी पैसे नाही आणि आम्ही येथेच अडकल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. गावी जाण्यासाठी आमची व्यवस्था करून द्यावी.
- रामप्रतापराय, बेगुलसराय बिहार.