म. गां. आयुर्वेद रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 09:11 PM2021-04-22T21:11:32+5:302021-04-22T21:11:41+5:30

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी १०० खाटांचा दक्षता विभाग

M. Village 100-bed Kovid Care Center at Ayurveda Hospital in vardha | म. गां. आयुर्वेद रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर

म. गां. आयुर्वेद रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर

googlenewsNext
ठळक मुद्देया कोरोना दक्षता विभागाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ रोजी संस्थेचे विश्वस्त माजी आमदार सागर मेघे यांच्या हस्ते व उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे

वर्धा - दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाशी संलग्न महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्र, सालोड हिरापूर येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी नव्याने १०० रुग्ण खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे खाजगी तत्वावर सदर कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.

या कोरोना दक्षता विभागाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ रोजी संस्थेचे विश्वस्त माजी आमदार सागर मेघे यांच्या हस्ते व उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शन तत्वानुसार या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना भरती केले जाईल, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी डाॅ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर, प्रकुलगुरू डाॅ. ललित वाघमारे यांनी दिली आहे

Web Title: M. Village 100-bed Kovid Care Center at Ayurveda Hospital in vardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.