शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

द्वेषाला प्रेम अन् माणुसकी हेच उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:20 PM

द्वेषाला उत्तर द्यायचे असेल तर प्रेमाची बाजू सशक्त करावी लागते, आज द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कारण प्रेम करणाऱ्यांची क्षमता कमी झाली आहे. माणुसकीच्या हत्यारापुढे काहीही टिकत नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । सुरेश द्वादशीवार यांचे ‘गांधी समजून घेताना’ व्याख्यानमालेत प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : द्वेषाला उत्तर द्यायचे असेल तर प्रेमाची बाजू सशक्त करावी लागते, आज द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कारण प्रेम करणाऱ्यांची क्षमता कमी झाली आहे. माणुसकीच्या हत्यारापुढे काहीही टिकत नाही. त्यामुळे आपल्यातली माणुसकी वाढवावी लागेल, असे उद्गार संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी ‘महात्मा गांधी आणि त्यांचे टिकाकार’ या विषयावर संवाद साधताना काढले. गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत प्रा. द्वादशीवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.सत्तेची सूत्रे कामगारांच्या हाती, गरिबांच्या हाती असावी ही गांधींची भूमिका होती. हिंदुत्ववादीही फाळणीसाठी गांधींना गुन्हेगार ठरवतात. गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणत असत. शिवाय त्याचवेळी ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ अशी समन्वयाची हाकही देत. विविध धर्मियांसोबत हिंदूही गांधींना आपला नेता मानत. हे हिंदुत्ववाद्यांचे मूळ दुखणे आहे. स्वातंत्र्यानंतरही १९६७ पर्यंत या देशातील हिंदुत्ववाद्यांना निवडणुकांमध्ये सहा टक्केही मते कधी मिळाली नाही. या देशातील हिंदू समाज टिळक, गांधी अगदी मौलाना आझाद यांच्यामागे गेला; पण गोडसे गोळवलकरांच्या मागे कधी गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आंबेडकरवादीही गांधींवर सतत टीका करतात, कारण गांधी त्यांनी कधी समजूनच घेतला नाही.पुणे करारात डॉ. आंबेडकरांवर गांधींचा कोणताही दबाव नव्हता. गांधींचे उपोषण तर केवळ पाच दिवसांचेच होते. उलट त्याचा फायदा हा झाला की या देशातील सर्व मंदिरे त्या काळी दलितांसाठी खुली झाली. तुम्ही पुणे करार का केला? असा प्रश्न लुई फिशर या चरित्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारला असता त्यांचे उत्तर होते, ‘या जगात मला समजून घेणारा माणूस फक्त गांधी आहे. त्या माणसाला माझे माणूसपणही कळते आणि सामर्थ्यही कळते.’व्याख्यानापूर्वी डॉ. सुभाष खंडारे लिखित ‘सत्याची हत्या’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागताध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या हस्ते अतिथींचे चरखा, खादीवस्त्र आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंकज वंजारे यांनी तर आभार तुषार पेंढारकर यांनी मानले.क्रांतिकारकांबाबत पालकत्वाची भूमिका घेतलीया कार्यक्रमात डॉ. प्रमोद मुनघाटे (नागपूर) आणि प्रा. प्रशांत देशमुख यांनी द्वादशीवार यांची प्रकट मुलाखत घेत महात्मा गांधींच्या संदर्भातील जनमनातील विविध शंकांचे निरसन केले. सशस्त्र क्रांतिकारकांसंदर्भात गांधींवर होणाऱ्याआक्षेपांना उत्तर देताना प्रा. द्वादशीवार म्हणाले, वाट चुकलेले देशभक्त असा उल्लेख करणाऱ्या गांधींची या क्रांतिकारकांबाबत भूमिका नेहमीच पालकत्वाची होती. गांधी आदर्श आहेत; पण अनुकरणीय नाही, अशी नवी पिढी म्हणते. या संदर्भात उत्तर देताना द्वादशीवार म्हणाले, आदर्श हा पुस्तकात ठेवायचा नसतो तर तो अनुसरायचा असतो. ज्यांना अनुकरण करता येत नाही त्यांनी आपले दुबळेपण मान्य केले पाहिजे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा अनेकांच्या हत्या झाल्यात त्या उगाच झाल्या आहेत का? आपल्यात सामर्थ्य नाही म्हणून ते इतरांमध्येही नाही, असे म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले.