रबीचे नुकसान, मळणी यंत्राची घरघर थांबली
By Admin | Updated: March 14, 2015 02:01 IST2015-03-14T02:01:12+5:302015-03-14T02:01:12+5:30
बुधवारी रात्री विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गहू, चन्याचे नुकसान झाले. यामुळे हार्वेस्टर आणि हडींबा या मळणी यंत्राची घरघरही थांबल्याचे चित्र आहे़

रबीचे नुकसान, मळणी यंत्राची घरघर थांबली
सेवाग्राम : बुधवारी रात्री विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे गहू, चन्याचे नुकसान झाले. यामुळे हार्वेस्टर आणि हडींबा या मळणी यंत्राची घरघरही थांबल्याचे चित्र आहे़
खरिपाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रबी पिकांवर आशा असताना नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांच्या मागेच लागली़ हातात आलेला गहू व चना आता धोक्यात आला आहे. शेतात वाळलेला गहू व चना आहे. मळणी यंत्राचे एकाच वेळी काम आल्याने शेतकरी यंत्राच्या प्रतीक्षेत दिसून येतात़ सेवाग्राम, हमदापूर परिसरात हार्वेस्टर दाखल झाले आहेत़ गहू काढण्याच्या कामालाही वेग आला होता; पण बुधवारी आलेल्या पावसाने हार्वेस्टरला विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे दिसते़ चना सवंगून झाकून ठेवण्यात आलेला असून संकटे पाठपुरावा करीत असल्याचे दिसते़
उदरनिर्वाहाचे साधन शेती व शेती उत्पादने असल्याने पिके हातची जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नैसर्गिक संकटांचा सामना करणारा शेतकरी मात्र बाजार भावाने हतबल झाल्याचे दिसून येत आहे़ सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेती कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे़(वार्ताहर)