भुसावळ-नागपूर पॅसेंजरमध्ये लुटमार

By Admin | Updated: January 28, 2017 01:03 IST2017-01-28T01:03:04+5:302017-01-28T01:03:04+5:30

मालखेड-तळणी रेल्वे स्थानकादरम्यान भूसावळ-नागपूर पॅसेंजरमधील प्रवाशांना पाच ते सहा तरुणांनी शस्त्राचा

Looter in Bhusaval-Nagpur Passenger | भुसावळ-नागपूर पॅसेंजरमध्ये लुटमार

भुसावळ-नागपूर पॅसेंजरमध्ये लुटमार

दोघांना अटक, तीन फरार : लोहमार्ग पोलिसांची कारवाई
वर्धा : मालखेड-तळणी रेल्वे स्थानकादरम्यान भूसावळ-नागपूर पॅसेंजरमधील प्रवाशांना पाच ते सहा तरुणांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास चक्र फिरवुन दोघांना अटक केली तर तिघे अद्यापही फरार आहेत. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.
आकाश सुरेश बर्वे (२१) रा. दत्त कॉलनी अकोला, व डोमनिक मैनफ्रेंड कोफ (१९) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य आरोपींचीही ओळख पटली असून ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
पोलीस सुत्रानुसार, मालखेड-तळणी रेल्वे स्थानकादरम्यान भूसावळ-नागपूर या धावत्या पॅसेंजर गाडीत प्रवाशांना शस्त्रांच्या धाकावर लुटले. सदर रेल्वे प्रवाशांनी पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवल्याची माहिती वर्धेच्या लोहमार्ग पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तपासाची चके्र फिरविली. आरोपींचे वर्णन मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या सहकाऱ्यांचा तपास सुरू आहे.

प्रवाशांनी तळणीत रोखली रेल्वे
४धावत्या रेल्वे गाडीत होत असलेल्या लुटमारीची माहिती गाडीतील प्रवाशांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रवाशांनी सदर रेल्वे तळणी रेल्वे स्थानकावर रोखून धरली. मात्र आरोपींनी रेल्वेतून उडी घेवून पळ काढला. मात्र लुटमार करणाऱ्यांची ओळख पोलिसांना मिळताच त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Looter in Bhusaval-Nagpur Passenger