शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
4
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
5
किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
6
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
7
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
8
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
9
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
10
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
11
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
12
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
13
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
14
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
15
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
16
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
17
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
18
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
19
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
20
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

लग्नासाठी कुंडली पाहता; मग आरोग्याची कुंडली का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 16:46 IST

जवळच्या नात्यात लग्न करू नका : आनुवंशिक आजारांचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विवाह जुळविताना आपण आधी आपली कुंडली जुळवीत असतो; पण आता आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व सिकलसेलमुक्त समाजनिर्मितीसाठी कुंडली जुळविण्यापेक्षा आरोग्यपत्रिका तपासून लग्न जुळवणे महत्त्वाचे आहे; कारण सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार असून हा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात असतो. त्यामुळे अशा आनुवंशिक आजाराचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर विवाहापूर्वी आरोग्यकुंडलीही जुळविणे आता आवश्यक आहे.

सिकलसेल किंवा इतर कोणता - आनुवंशिक आजार असेल तर तो लपविला जाता कामा नये. सिकलसेल असल्यास नियमित आरोग्य तपासणी करून हिमोग्लोबिनची पातळी बरोबर ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा. फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घ्या, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो; परंतु अनेक व्यक्ती यांकडे दुर्लक्ष करतात. सिकलसेल आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाते.

आरोग्य तपासणीमध्ये काय पाहाल?आरोग्य तपासणी : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्यामार्फत सिकलसेल सोलॅबिलिटी तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावपातळीवरील आरोग्यसेविका व आशासेविका यांच्यामार्फत रक्ततपासणी व समुपदेशन निःशुल्क करण्यात येत आहे.

सिकलसेल स्क्रीनिंग : जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून सिकलसेल स्क्रीनिंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ही चाचणी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करून देण्यात आली असून, व्यक्तींना त्या ठिकाणी जाऊन सिकलसेल स्क्रीनिंग करता येते.

नात्यात लग्न टाळायला हवे :लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ततपासणी करून घ्या.दोघेही वाहक असतील तर एक वाहक एक ग्रस्त असेल तर किवा दोघेही ग्रस्त असतील तर त्यांच्या होणाऱ्या अपत्याला तो आजार होऊ शकतो. म्हणून असे विवाह टाळलेले बरे.

आरोग्यकुंडली का पाहिली जात नाही?आता बदलत्या काळात जात, पात, धर्म व वंश पाहण्यापेक्षा आरोग्य कुंडली पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण ज्या व्यक्त्तीशी विवाह करतो, तो आजारी तर नाही ना, याची माहिती मिळेल.- सूरज वानखेडे, युवक.

कुंडलीचे ३६ गुण जोडण्यापेक्षा आरोग्याचे गुण जुळल्यास आयुष्यभर जोडपे निरोगी राहतील व त्यातून त्यांचा आर्थिक विकासही होईल, यासाठी आरोग्यचाचणी करूनच विवाह करण्याची परंपरा सुरू करायला हवी.- अंकित सोनुले, युवक.

सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे. सिकल कॅरिअरच्या माध्यमातून हा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेलचे जर समूळ उच्चाटन करायचे असेल तर विवाहयोग्य मुलामुलींची सिकल स्क्रीनिंग करावी. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.- डॉ. अरविंद दुबे, वर्धा. 

टॅग्स :marriageलग्नHealth Tipsहेल्थ टिप्सwardha-acवर्धा