लॉकडाऊनचा भाजी-फळविक्रेत्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:16+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून ते १४ एप्रिल आणि नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले; मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ३ मे आणि नंतर थेट १७ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली.

Lockdown hits vegetable and fruit sellers | लॉकडाऊनचा भाजी-फळविक्रेत्यांना फटका

लॉकडाऊनचा भाजी-फळविक्रेत्यांना फटका

ठळक मुद्देफळ-भाजी फेकली रस्त्याच्या कडेला : घाणीच्या साम्राज्यात भर

वर्धा : तातडीच्या लॉकडाऊनमुळे शहरातील भाजीपाला, फळविक्रेत्यांना व्यावसायिकांना नुकसानाला सामोरे लागले. खरेदी केलेले फळे आणि भाजीपाला इतरत्र फेकून द्यावा लागला. परिणामी, रहिवासी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून ते १४ एप्रिल आणि नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले; मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ३ मे आणि नंतर थेट १७ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. मात्र, रविवारी दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यात जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली. यानंतर तत्काळी दोन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. शहरात स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि केसरीमल कन्या विद्यालयाच्या मैदानावर भाजी बाजार भरतो. किरकोळ भाजी-फळ विक्रेते घाऊक फळ-भाजी व्यावसायिकांकडून फळे आणि भाजीपाल्याची खरेदी करतात. दोन दिवस तत्काळ स्वरूपाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले. या दरम्यान व्यवसाय न करता आल्याने अनेक फळ-भाजी विक्रेत्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले. खरेदी केलेली फळे आणि भाजीपाला अनेकांना फेकून द्यावा लागला. केसरीमल शाळा परिसरात अनेकांनी सडकी फळे आणि भाजीपाला फेकून दिला. या सडक्या भाजी-फळांमुळे या परिसरात मोठी दुर्गंधी सुटली आहे. सडक्या भाजी आणि फळांवर मोकाट जनावरे उच्छाद घालत होती.

Web Title: Lockdown hits vegetable and fruit sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.