मराठी चित्रपट ‘निर्धार’मध्ये झळकणार स्थानिक कलावंत

By Admin | Updated: July 19, 2015 02:13 IST2015-07-19T02:13:26+5:302015-07-19T02:13:26+5:30

विदर्भ मोशन्स पिक्चर निर्मित, सचिन उराडे दिग्दर्शीत ‘निर्धार’ या मराठी व्यावसायिक चित्रपटाचा मुहूर्त वाघोली येथे पार पडला.

Local artists who will be seen in Marathi film 'Nirdhar' | मराठी चित्रपट ‘निर्धार’मध्ये झळकणार स्थानिक कलावंत

मराठी चित्रपट ‘निर्धार’मध्ये झळकणार स्थानिक कलावंत

वाघोली येथे झाला चित्रपटाचा मुहूर्त : ग्रामीण समस्येवर आधारित चित्रपटात तपासे होणार ‘पाटील’
हिंगणघाट : विदर्भ मोशन्स पिक्चर निर्मित, सचिन उराडे दिग्दर्शीत ‘निर्धार’ या मराठी व्यावसायिक चित्रपटाचा मुहूर्त वाघोली येथे पार पडला. या चित्रपटात हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती, बाजार समितीचे संचालक संजय तपासे हे पाटलाची मुख्य भूमिका साकारणार आहेत. यापूर्वीही एका मराठी चित्रपटात येथील कलावंताची वर्णी लागली होती. यामुळे हिंगणघाट शहराचाही मराठी चित्रपटसृष्टीत लौकिक होतोय.
हिंगणघाट परिसरात एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे उल्लेखनीय! या चित्रपटाचा मुहूर्त वाघोली या गावात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणजीत कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजू तिमांडे, कृउबास सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, पं.स. सभापती संजय तपासे, उपसभापती मिलिंद कोपुलवार, जि.प. सदस्य प्रा. उषाकिरण थुटे, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, अनिल भोंगाडे, प्राचार्य भाष्कर आंबटकर, दिग्दर्शक सचिन उराडे आदी उपस्थित होते.
चित्रपटाबाबत माहिती देताना दिग्दर्शक उराडे म्हणाले की, ‘निर्धार’ हा ग्रामीण भागातील ज्वलंत समस्येवर आधारित चित्रपट आहे. चित्रीकरण वाघोलीसह हिंगणघाट परिसरात होणार आहे. चिखलदरा, महाकाळी, ताडोबा परिसरात या चित्रपटातील गीतांचे चित्रीकरण होणार आहे. स्थानिक कलाकारांनाही या चित्रपटात संधी मिळणार आहे. वाघोली या गावी चित्रपटाचे अधिक चित्रीकरण होणार आहे. यात पं.स. सभापती संजय तपासे हे ‘पाटील’च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पूर्णपणे ग्रामीण जीवनावर व समस्यांवर आधारित असून त्यास पे्रक्षकांकडून प्रतिसाद मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आ. कांबळे यांनी हिंगणघाट परिसरातील ग्रामीण भागात या चित्रपटाची निर्मिती अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. यावेळी सोमदल करंजेकर, प्रा. सुनील खेमदेव, सरपंच जयश्री वरघणे, अविनाश ढगे, मुजबैले, राऊत, धोटे, शीला महाकाळकर, रामू वासेकर, मंदा भट, आशा जवादे, अनिल भोयर, प्रवीण काळे, मंगला गौळकार, अंकुश दुरूगवार, बापू इटनकर, गुंफा दुरूगवार, वसंत नौकरकर आदी हजर होते. प्रास्ताविक प्रवीण खूणकर तर संचालन गोपाल बाळबुधे यांनी केले. आभार राहुल बागुल यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)
चित्रपटात झळकणारा दुसरा कलावंत
पंचायत समिती सभापती संजय तपासे हे हिंगणघाट येथील चित्रपटात झळकणारे दुसरे कलावंत ठरणार आहे. यापूर्वी ‘गोट्याची कमाल, सोट्याची धमाल’ या चित्रपटातही हिंगणघाट येथील एक कलावंत चमकला आहे. यातही येथील कलावंताने विनोदी पात्र रंगविले आहे.
आता हिंगणघाट व ग्रामीण भागात चित्रित होणाऱ्या ‘निर्धार’ या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपटात गावातील ‘पाटील’ ही मुख्य भूमिका हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती आणि बाजार समितीचे संचालक संजय तपासे वठविणार आहेत. शिवाय हिंगणघाट परिसरातील ग्रामीण भागात चित्रीकरण होणारा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. यामुळेही हिंगणघाटला चित्रपटसृष्टीचे वेगळे वलय मिळणार असल्याचेच दिसते.

Web Title: Local artists who will be seen in Marathi film 'Nirdhar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.