भरधाव ट्रकने युवकास चिरडले; वडील गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST2021-07-08T05:00:00+5:302021-07-08T05:00:06+5:30
दिलीप व्यापारी आणि सारंग व्यापारी दोघे रा. झाडगाव गोसावी हे एम.एच.३२ आर. ८५८१ क्रमांकाच्या दुचाकीने हे वर्ध्याला येत असताना बल्लाळ लॉन समोरील रस्त्यावर असलेल्या वळण रस्त्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या एम.एच.३२ क्यू. ७००९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने दुचाकीला समोरुन धडक दिली. यात सारंग व्यापारी हा ट्रकच्या चाकात आला असता त्याचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव ट्रकने युवकास चिरडले; वडील गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भरधाव ट्रकने दुचाकीला समोरुन दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवक ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वडिल गंभीर जखमी झाले. हा अपघात म्हाडा कॉलनी परिसरातील बल्लाळ लॉन समोरील रस्त्यावर बुधवारी सकाळच्या सुमारास झाला. सारंग दिलीप व्यापारी (१६) असे मृतकाचे नाव आहे. तर दिलीप व्यापारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दिलीप व्यापारी आणि सारंग व्यापारी दोघे रा. झाडगाव गोसावी हे एम.एच.३२ आर. ८५८१ क्रमांकाच्या दुचाकीने हे वर्ध्याला येत असताना बल्लाळ लॉन समोरील रस्त्यावर असलेल्या वळण रस्त्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या एम.एच.३२ क्यू. ७००९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने दुचाकीला समोरुन धडक दिली. यात सारंग व्यापारी हा ट्रकच्या चाकात आला असता त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वडिल दिलीप व्यापारी हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी अपघातस्थळी जात ट्रक जप्त करीत चालकास अटक केली.