भरधाव ट्रक पडला कालव्यात; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:43 IST2019-08-20T23:43:07+5:302019-08-20T23:43:31+5:30
नागपूरवरुन जामकडे सेंटिगचे पाईप घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रक अनियंत्रित होत कालव्यात पडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील आजदा शिवारात घडली.

भरधाव ट्रक पडला कालव्यात; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूरवरुन जामकडे सेंटिगचे पाईप घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रक अनियंत्रित होत कालव्यात पडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील आजदा शिवारात घडली. चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
भरधाव ट्रक अनियंत्रित होत आजदा शिवारातील कॅनलच्या पुलावर जाऊन धडकला. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना बघता-बघता ट्रक कॅनलमध्ये पडला. या भीषण अपघातात क्लिनरच्या अंगावर ट्रक मधील पाईप पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. एहसान खान अयुब खान (२८) रा. पलवल मेवाद (हरियाणा) असे मृतकाचे तर नशिब खान अब्बास खान (२२) रा. मटेपुल पलवल (हरियाणा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे नागपूरवरून सेंटिंगचे पाईप घेऊन हा ट्रक जामकडे येत असलेल्या ट्रक चालक नशीब खान अब्बास खान यास झोपेची डुलकी आली.
अशातच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान ट्रकने कॅनलच्या पुलाला धडक दिली. दरम्यान ट्रक २० फुट खोल कॅनल मध्ये पडला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, चंदू बन्सोड, बंडु डडमल, शंकर भोयर, सचिन गाढवे, दिलिप वांदिले, दीपक जाधव, प्रविण बागडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेतला. तसेच जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.