शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी उरली नावाला, उठाव 'एमपी'च्या मालाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:09 IST

Wardha : एक्साइज, पोलिस करतात काय? सर्रास विक्री, घरपोच डिलिव्हरीची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्रास खुलेआम दारू विकली जात आहे. विशेष म्हणजे केवळ मध्य प्रदेशात विक्रीची परवानगी असलेले विदेशी मद्य धडाक्यात येथे विकले जात आहे. यामुळे मद्य प्राशन करणाऱ्यांना विविध आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्याला थोर महापुरुषांचा वारसा आहे. त्यांच्या जिल्ह्याची ओळख देशात झाली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला वास्तव्य केले. तेथून अनेक चळवळी चालविल्या. विनोबा भावे यांनी स्वातंत्र्यानंतर भूदान चळवळ चालविली. त्यामुळे या जिल्ह्याला देशात आगळेवगळे स्थान आहे. त्याचीच दखल घेत शासनाने १९७४ मध्ये जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. एकाअर्थाने ती महात्मा गांधी, विनोबा भावे यांना आदरांजली होती त्यांच्याप्रति शासनाने कृतज्ञता व्यक्त केली होती. मात्र, कालांतराने दारूबंदी फसवी निघाली. हा निर्णय केवळ कागदावरच राहिला. 

राज्यात दारूबंदीसाठी उत्पादन शुल्क विभाग निर्माण करण्यात आला आहे. त्यांच्या साथीला पोलिसही आहेत. मात्र, जिल्ह्यात दारूबंदीची पुरती वाट लागली आहे. पोलिस केवळ आपल्या 'सोयी'ने धाडसत्र राबवीत असल्याची चर्चा होऊ लागली आहे. उत्पादन शुल्क विभाग तर कधीच दारूविक्री अथवा साठ्यावर धाड टाकताना दिसत नाही. मग या विभागाची जिल्ह्यात गरजच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पोलिस अनेकदा कारवाई करून वाहनांसह लाखोंचा साठा जप्त केल्याचा गवगवा करतात. आपली पाठ थोपटून घेतात. नंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' असा कार्यक्रम सुरू होतो. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कार्यकाळात जानेवारी ते मे दरम्यान १४ कोटी ४ लाख ८६ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. मात्र, आता ही कारवाई काहीशी थंडावल्याचे चित्र दिसून येते. शहरासह जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. 

दारूविक्रेते शिरजोर झाले आहे. विशेष म्हणजे अनेक पोलिसांनाही कुठे दारू विकली जाते, याची इत्थंभूत माहिती आहे. मात्र, कारवाई करण्यास त्यांचे हात धजावताना दिसत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

लगतच्या जिल्ह्यातून होतो पुरवठाजिल्ह्याशेजारी नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्हे आहे. तेथे दारूबंदी नाही. या जिल्ह्यातून येथील दारूविक्रेते दारू आणतात. काही विक्रेते थेट मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीची दारू आणतात. ही दारू चढ्या दराने ग्राहकांना विकली जाते. अनेकदा बनावट दारू विकली जाण्याचाही धोका असतो. यामुळे पिणाऱ्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. मात्र, विक्रेत्यांना केवळ पैशाचा हव्यास दिसून येतो.

चिरीमिरी'मुळे निर्वावले, 'वर्दी'चा वचक दिसेना काही पोलिसांचे दारू विक्रेत्यांशी 'अर्थपूर्ण साटेलोटे असल्याची चर्चा आहे. अनेकदा 'चिरीमिरी' घेऊन प्रकरण दडपले जाते. यामुळे दारू विक्रेते निर्वावले आहे. त्यांना वर्दी'चा धाक उरला नाही. 'वर्दी'च आता 'दर्दी झाल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर खुद्द जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांच्या 'डीबी पथकात कार्यरत असलेले कर्मचारीच खुलेआम दारू ढोसण्यासाठी जात असल्याचेही सांगितले जाते.

फोन करा अन् दारू मागाशहरात अनेक दारू विक्रेते फोन केल्यास इच्छितस्थळी दारू पोहोचवून देतात. फोन करा अन् दारू मागवा, असा हा अफलातून प्रकार आहे. काही ठिकाणी अगदी बारप्रमाणे टेबल, खुर्चा टाकून पेग रिचविले जाते. काही ठिकाणी सत्यम, शिवमचा आव आणत 'एमपी'ची दारू विकली जाते. विशेष म्हणजे पोलिस विभागातील अनेकांना दारुविक्रीची माहिती आहे. तरीही कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशीच स्थिती दिसून येत आहे. नवीन पोलिस अधीक्षक याकडे काळजीने लक्ष देऊन 'झारीतील शुक्राचार्यां'ना शोधून काढतील का, हा खरा प्रश्न आहे. सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने दारुचे पाट वाहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीwardha-acवर्धा