लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे
By Admin | Updated: July 21, 2014 00:19 IST2014-07-21T00:19:54+5:302014-07-21T00:19:54+5:30
लिंगायत समाजाच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत़ या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी लिंगायत समाज संघर्ष समिती वर्धा शाखेच्यावतीने करण्यात आली़ याबाबत

लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे
वर्धा : लिंगायत समाजाच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत़ या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी लिंगायत समाज संघर्ष समिती वर्धा शाखेच्यावतीने करण्यात आली़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले़
निवेदनातून लिंगायत समाजातील ज्या जातींना आरक्षण दिले, त्यांचे आरक्षण कायम ठेवून महाराष्ट्रातील संपूर्ण लिंगायत समाजास ओबीसींचा दर्जा/आरक्षण द्यावे, महाराष्ट्रात लिंगायत समाजास लोकसंख्येच्या आधारावर खास बाब म्हणून अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा, लिंगायत समाजास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता व अल्पसंख्यक दर्जा मिळण्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, वाणी समाजास दिलेल्या ओबीसींचे आरक्षण दिलेल्या अध्यादेशातील ‘लिंगायत वाणी वगळून’ नमूद केलेला शब्द काढून लिंगायत वाणी जातीस ओबीसीचे आरक्षण देण्याबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा, शासन निर्णयानुसार लिंगायतांना सरकारी भूमी ‘दफन भूमी’ देण्यात यावी, सादर करण्यात येणाऱ्या शासकीय प्रपत्र अत्यंत सुलभ करण्यात यावे आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत़ कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्यांकरिता शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आला़ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा नगरे, सचिव सुरेशआप्पा कापसे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी रंगाप्पा कुबडे, सुधाकर कापसे, किरण पटेवार, सविता ढोले, उल्हास कापसे, अरुणआप्पा ढोले, प्रशांत मिराशे, सौरभ नगरे, सुभाष मोतेवार, प्रमोद बेलसरे, दत्तात्रय जिडेवार, अॅड. कुरझडकर, विजय माजरखेडे, सुरेशअप्पा पटेवार, प्रभाकर मोतेवार, अशोक मरडवार, उद्धव गाडेकर, रामचंद्र देमापुरे, वसंत मरडवार आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)