स्पर्धा परीक्षेकरिता ग्रंथालय उपयुक्त

By Admin | Updated: August 17, 2014 23:21 IST2014-08-17T23:21:02+5:302014-08-17T23:21:02+5:30

स्थानिक गो. से. वाणिज्य महाविद्यालय येथे ग्रंथालय विभागात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गं्रथालय विभागाच्यावतीने स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शक पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आले

Library useful for competitive exams | स्पर्धा परीक्षेकरिता ग्रंथालय उपयुक्त

स्पर्धा परीक्षेकरिता ग्रंथालय उपयुक्त

वर्धा : स्थानिक गो. से. वाणिज्य महाविद्यालय येथे ग्रंथालय विभागात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी गं्रथालय विभागाच्यावतीने स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शक पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल बारी यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. बारी यांनी दिवसेंदिवस प्रशासकीय सेवेतील परीक्षेचे स्वरुप बदलत आहे. या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता ग्रंथालय उपयुक्त ठरते. अभ्यासाच्या तयारीकरिता लागणारे साहित्य या माध्यमातून उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रंथांचा महत्तम उपयोग करून प्रशासकीय सेवेत यश प्राप्त करावे, असे आवाहन डॉ. बारी यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला डॉ. सिद्धार्थ बुटले, डॉ. ए. के. मंसुरी, डॉ. एस. आर. चव्हाण, डॉ. एस. आर. जुनघरे, डॉ. संतोष मिश्रा, डॉ. के. व्ही. सोमनाद, डॉ. अनिल रामटेके, प्रा. अतुल फिरके, प्रा. निस्ताने, प्रा. शंभरकर, प्रा. जोशी, प्रा. मिलिंंद शेंडे, प्रा. अनुपमा लाभे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करता यावा, गं्रथालयातील उपलब्ध ग्रंथांचा परिचय व्हावा व गं्रथांचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक उपयोग करावा या उद्देशाने या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रंथपाल प्रा. नागसेन बनसोड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांकरिता अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त इतरही सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीगत विकासाकरिता तसेच यश संपादन करण्याकरिता उपयोग करावा. वाचनाने बुद्धीचा विकास होतो परंतु या इंटरनेटच्या युगात लोकांचा वाचनाचा कल कमी होताना दिसून येतो तर युवा वर्ग मात्र इंटरनेट व मोबाईलचा अतिवापर यामुळे विद्यार्थी वाचनापासून दूर गेलेला आहे. त्यामुळे त्यांना वाचनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी ग्रंथालयावर आहे, असा सुर मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
आयोजनाला प्रा. हुमेरा काझी, डॉ. मंगला तोमर, प्रा. अमेय लोहार, प्रा. प्रवीण ठाकरे, प्रा. अंचल पांडे, प्रा. तिवारी, वाडिभस्मे, अरुण आत्राम, मोदनकर, संध्या राऊत, गावंडे आदींनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Library useful for competitive exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.