लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: समुद्रपूर- शेडगाव चौरस्ता सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास अडीच ते तीन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वाहनाच्या धडकेत या बिबटचा मृत्यू झाला असावा असा वनविभागाने प्राथमिक अंदाज वर्तविला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट.होईलया वेळी वनपरिक्षेत्राधिकारी अधिकारी पि.डी बाभळे क्षेत्रसाहाय्यक विजय धात्रक यांनी त्यांच्या सह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांरी व ठाणेदार प्रविण मुंडे व त्यांचे सहका-यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत बिबट्याची पाहणी केली असता त्याच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत होते. या बिबटचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यात आढळला बिबट्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:33 IST
समुद्रपूर- शेडगाव चौरस्ता सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास अडीच ते तीन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला.
वर्धा जिल्ह्यात आढळला बिबट्याचा मृतदेह
ठळक मुद्देवाहनाच्या धडकेने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाजमृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही