शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी बाबासाहेबांची संकल्पना धुळीस मिळविली

By admin | Updated: February 26, 2017 00:57 IST

मातृ संघटनेचे असंख्य गट-तट निर्माण करून समाजातील नेत्यांनी बाबासाहेबांची संकल्पना धुळीस मिळविली आहे,

हर्षवर्धन ढोके : पत्रकार परिषदेतील वक्तव्य, ‘दि रिपब्लीकन’ विषयावर चर्चासत्र हिंगणघाट : मातृ संघटनेचे असंख्य गट-तट निर्माण करून समाजातील नेत्यांनी बाबासाहेबांची संकल्पना धुळीस मिळविली आहे, असा आरोप हर्षवर्धन ढोके यांनी केला. ‘दि रिपब्लीकन’ या विषयावरील चर्चासत्र व व्याख्यानानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नवीन इंदुरकर, सुनंदा इंदुरकर, ज्योती हिरपुडे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, रिपब्लीकन राष्ट्राचे निर्माते, आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मातृ संघटन दिले. राजकीय उत्कर्षासाठी दि रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया, धम्मचरणासाठी प्रचार व प्रसाराकरिता दि बुद्धीस्ट सोसायटी आॅफ इंडिया आणि सामाजिक स्थैर्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली; पण या मातृसंघटनेचे असंख्य गट-तट निर्माण करून समाजातील काही लोकांनी बाबासाहेबांची संकल्पनाच धुळीस मिळविली आहे. सत्ता, पद आणि प्रतिष्ठेच्या लालसेने अनेकांनी दुकानदाऱ्या सुरू केल्या आहेत. पर्यायाने बाबासाहेबांना अभिपे्रत असलेला प्रबुद्ध भारत निर्माण होऊ शकलेला नाही, हे भिषण वास्तव आहे. बहुजन, मूलनिवासी सारख्या विकृत कल्पना राबवून समाजातील घटकांना एकमेकांपासून दूर करणाऱ्यांचे खरे स्वरूप ओळखणे गरजेचे आहे. कारण, बाबासाहेबांनी बहुजन मुलनिवासी सारख्या वेगळी व दिशाहीन संकल्पना कधीही स्विकृत केली नाही वा सांगितल्याही नाही. एका पक्षाचे असंख्य गट, विविध फुटीरवादी शाखा, विविध तुकडे, रक्ताचे नाते सांगून भ्रमीत करणारे वंशज, असे एका ना अनेक पक्ष आणि संघटना आहेत. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी निर्वाणीची वेळ आली आहे. गट-तट, मायावी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना बहिष्कृत करून बाबासाहेबांनी विश्वासाने दिलेले मातृसंघटन मजबुत करणे प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचे कर्तव्य आहे. त्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायांनी रिपब्लीकनचे ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शेवटी ढोके यांनी केले. यावेळी दि रिपब्लीकन या विषयावरही चर्चा करण्यात आली. पत्रपरिषदेला आयोजकांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)