विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम कोविड सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:32 IST2020-08-19T11:31:56+5:302020-08-19T11:32:21+5:30
सेवाग्राम येथील प्रसिध्द कस्तुरबा रूग्णालयाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भेट दिली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम कोविड सेंटरला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेवाग्राम येथील प्रसिध्द कस्तुरबा रूग्णालयाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भेट दिली. कस्तुरबा रूग्णालयाच्या मेडिसीन विभागाच्या कार्यालयात ठीक ११.०७ वा.आगमन झाले. या प्रसंगी त्यांच्यासोबत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.रामदास तडस, आ.दादाराव केचे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोडे, नगराध्यक्ष अतुल तराळे तसेच महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे सचिव डॉ बी.एस.गर्ग, संचालक परमानंद तापडिया, अधिष्ठाता डॉ नितीन गगणे रूग्णालयाचे भैषज्य अधीक्षक डॉ एस.पी.कलंत्री, प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार प्रीती डुडुलकर, मंडळ अधिकारी डेहनकर, सेवाग्राम पोलिस स्टेशनचे कांचन पांडे इ.उपस्थित होते.