वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 12:07 IST2017-12-22T12:01:41+5:302017-12-22T12:07:43+5:30

आंजी मोठी येथील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले व सर्वधर्मसमभावाचा वारसा जपणारे, गीताचार्य तुकारामदादांचे शिष्य व माजी सरपंच लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे येथे शुक्रवारी पहाटे निधन झाले.

Laxminarayan Gupta, senior activist of Wardha district, passed away in old age | वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे निधन

वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे निधन

ठळक मुद्देआयुर्वेदतज्ज्ञ, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान

आॅनलाईन लोकमत
वर्धा: आंजी मोठी येथील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले व सर्वधर्मसमभावाचा वारसा जपणारे, गीताचार्य तुकारामदादांचे शिष्य व माजी सरपंच लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे येथे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
गावाच्या विकासात नेहमी पुढे राहून सहकार्य करण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले होते. गावात शाळा, सहकारी संस्था सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने गावाने सच्चा कार्यकर्ता गमावला अससल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: Laxminarayan Gupta, senior activist of Wardha district, passed away in old age