पांढऱ्या सोन्यातून निघताहेत अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:18+5:30
खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला गती देत आहेत.

पांढऱ्या सोन्यातून निघताहेत अळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी वेचणी करून घरात साठविलेल्या कापसातून अळ्या निघत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला गती देत आहेत. पण वेचणी करून घरात आणलेला कापूस साठविल्यानंतर त्यातून अळ्या निघत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागाने हवालदील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
उभ्या पिकावर बोंडअळीचा अटॅक
चिकणी परिसरातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे असले तरी कृषी विभाग उंटावरून शेळ्या हाकलत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. बोंडअळीमुळे यंदा उत्पादनात घट होईल, अशी शक्यता आहे.