शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे.

ठळक मुद्देधरण वर्धा जिल्ह्यात; पाण्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्याला!

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात लालनाला प्रकल्प आहे; मात्र मुसळधार पाऊस आल्यास धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नदीकाठावरील घरांना धोका होतो. शिवाय प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना लाभ मात्र, चंद्रपूरला होतो. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे. तसेच कोरा, उसेगाव, तळोदी, अकोला, गणेशपूर, कृष्णापेठ, पाताळकोट, साखरा, दसोडा, सिल्ली, मंगरूळ, गाठवदेव महारमजरा, गाडामोडी या गावांतील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले.या गावातील शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन धरणाला अल्प मोबदल्यात दिली. धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण असताना अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीपासून वंचित असून मजुरी करून हलाखीचे जीवन जगत आहे. प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना त्याचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न मिळता चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राला दिले जात आहे. आतातर चक्क भूमिगत जलाहिनी टाकून चिमूर भागात पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मध्यंतरीच्या काळात माया ठवरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारे पाणी अडविण्याकरिता आंदोलन केले. आंदोलन दडपण्यात आले. या धरणात पाण्याचा साठा २७६१३ दलघमी असून लांबी ३३१५ मीटर, उंची १४६१ लिटर आहे. सद्यस्थितीत धरण भरले असून थोडाही पाऊस आला तर धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नाल्याच्या दोन्ही काठावरच्या जमिनी खरडून वाहून जात असल्याने शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धरणग्रस्त अनेक बाबीने त्रस्त आहेत.शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का?लालनाला प्रकल्प समुद्रपूर तालुक्यात आहे. त्यामुळे येथील शेतीक्षेत्र सिंचनाखाली यायला हवे. मात्र, प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना दिला जात नसून चंद्रपूर जिल्ह्यात महाऔष्णिक केंद्राला दिले जाते. पाणी चिमूर भागात पळविण्याचेही कटकारस्थान सुरू असताना शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Damधरण