Lallana found dead in the project | लालनाला प्रकल्पात आढळला मृतदेह
लालनाला प्रकल्पात आढळला मृतदेह

ठळक मुद्देकोरा परिसरात खळबळ : घटनास्थळी बघ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरा : येथील लालनाला प्रकल्पात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सदर घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवार ४ नोव्हेंबरला सकाळी काही नागरिक कोरा येथील लालनाला प्रकल्पाच्या भिंतीवरून जात असताना त्यांना तलावाच्या पाळी जवळ एक ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी सदर माहिती ग्रामस्थांना देताच ग्रामस्थांनीही घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
मृतदेहापासून काही अंतरावर एक पॉकेट आढळून आले. त्यात ९५० रुपये व एक मंगरुळ कोरा बसची काल दुपारची ३.३० वाजता दरम्यान तिकिट होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतले आहे. गिरड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, पोलीस कर्मचारी विनोद भांडे, राहुल मानकर यांनी घटना स्थळ गाळून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद गिरड पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर मृतकाची ओळख पटविणे सुरू होते.

Web Title: Lallana found dead in the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.